एक्स्प्लोर

रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन

Jalgaon Lok Sabha : रावेर लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आज जळगावात मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.  तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) भाजपकडून स्मिता वाघ (Smita Wagh) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आज रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी जळगावात मोठं शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांनी सकाळीच आपापले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावडे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील, उमेश नेमाडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भरले. यानंतर रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ जळगावात जाहीर सभा पार पडली.  

आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की - रक्षा खडसे

जाहीर सभेत रक्षा खडसे म्हणाल्या की, आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की. कारण  एवढ्या उन्हात आपण सर्वांनी मला आणि स्मिताताईंना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. समोरचे आज कितीही मुद्दे घेऊन सांगत असतील की दहा वर्षांत आम्ही काही केलं नाही. पण या जनतेला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही या  जिल्ह्यात काय काम केले आहेत. ही निवडणूक फक्त खासदार निवडून देण्यासाठी नाही तर देशाच्या निकासाठी आहे. त्यामुळे आपण सर्वानी संकल्प करायचा आहे की निवडणूक फक्त रक्षाताई आणि स्मिताताई यांना जिंकवण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहेत, असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.

जनतेला कळतं, कुणाला मत द्यायचं कुणाला नाही - स्मिता वाघ

स्मिता वाघ म्हणाल्या की, ही जनता मला नक्कीच निवडून आणेल, असं मला या ठिकाणी विश्वास आहे. आज सगळ्या विरोधकांनाही लक्षात येईल की त्यांनी काल आम्हाला आव्हान केलं होतं. आमच्यावर वाटेल तसे ओरडले होते, पण जनता ही सुसंस्कृत आहे. ‘जनतेला कळतं, कुणाला मत द्यायचं कुणाला नाही, असे मत स्मिता वाघ यांनी व्यक्त करत येणाऱ्या १३ तारखेला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा 

त्यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, एका जागेवर ठप्प पडून; फडणवीसांनी डागली तोफ

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon District Central Cooperative Bank Elections 2026: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत पाच जागा बिनविरोध; गिरीश महाजन यांचाही मार्ग मोकळा, आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत पाच जागा बिनविरोध; गिरीश महाजन यांचाही मार्ग मोकळा, आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: 3 दिवसांपासून गायब, चौथ्या दिवशी खड्ड्यात दुचाहीसह तरुणाचा आढळला मृतदेह; जळगावमध्ये खळबळ
3 दिवसांपासून गायब, चौथ्या दिवशी खड्ड्यात दुचाहीसह तरुणाचा आढळला मृतदेह; जळगावमध्ये खळबळ

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Embed widget