(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंचं आवाहन, लोकसभेपूर्वी धमाका करणार?
Raksha Khadse : एकनाथ खडसे यांची भाजपामध्ये घरवापसी होणार अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. यावर रक्षा खडसे यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Raksha Khadse जळगाव : गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरु आहे. आता भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रक्षा खडसे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे भाजपामध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा (BJP) पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावताय - गिरीश महाजन
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीदेखील एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
पुन्हा भाजपात जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार - एकनाथ खडसे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना तुम्ही भाजपमध्ये परतणार का? याबाबत वक्तव्य केले होते. एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले होते की, तावडे याच्याकडून भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तावडे आणि आपले चांगले संबंध आहेत. मात्र, भाजपने माझा खूप छळ केलेला असल्याने पुन्हा भाजपामध्ये जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
- बारसकरांनंतर आता संगीता वानखेडे मैदानात, मनोज जरांगेंवर गंभीर आरोप, शरद पवारांचा हात असल्याचाही दावा
- कार्यालय पाडल्याने राडा, वंचितचे मुंबईभरातील कार्यकर्ते कुर्ल्यात जमायला सुरुवात, तणाव वाढल्याने पोलिसांनी फोर्स मागवली