कार्यालय पाडल्याने राडा, वंचितचे मुंबईभरातील कार्यकर्ते कुर्ल्यात जमायला सुरुवात, तणाव वाढल्याने पोलिसांनी फोर्स मागवली
Mumbai News: कार्यालय पाडल्याने राडा, वंचितच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला स्टेशनकडे जाणारा रस्ता रोखला. या रस्त्यावरील वाहतूक कार्यकर्त्यांनी रोखून धरली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
![कार्यालय पाडल्याने राडा, वंचितचे मुंबईभरातील कार्यकर्ते कुर्ल्यात जमायला सुरुवात, तणाव वाढल्याने पोलिसांनी फोर्स मागवली vanchit bahujan aghadi party workers get angry over BMC demolish party office in Kurla Chunabhatti कार्यालय पाडल्याने राडा, वंचितचे मुंबईभरातील कार्यकर्ते कुर्ल्यात जमायला सुरुवात, तणाव वाढल्याने पोलिसांनी फोर्स मागवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/35064d6aa939af15e40c700ac67063611708594582649954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुंबई महानगरपालिकेने वंचित बहुजन आघाडीच्या एका अनधिकृत कार्यालयावर पाडकामाची कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी कुर्ला रेल्वे (Kurla Railway Station) स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखून धरला आहे. याठिकाणी गेल्या काही तासांमध्ये वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून १५ फेब्रुवारी रोजी कुर्ला चुनाभट्टी येथे असलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय तोडण्यात आले होते. या विरोधात आज वंचितच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या एल विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखला होता. कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की, त्यांनी पालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार ही तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये काही वंचितचे कार्यकर्ते जखमी देखील झाले आहेत. जोपर्यंत पालिका पुन्हा हे कार्यालय उभे करुन देत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही. तसेच सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप ही वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
कुर्ल्यात तणाव पुन्हा वाढला
सकाळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगवले होते. मात्र, काहीवेळापूर्वी वंचितचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा कुर्ला स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखून धरला आहे. या आंदोलनाची माहिती कळताच मुंबईच्या विविध भागातून वंचितचे कार्यकर्ते कुर्ला परिसरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवून घेतली आहे. काहीवेळापूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करत वंचितच्या कार्यकर्त्यांना एका बाजूला मागे ढकलले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीप्रमाणात सुरु झाली. परंतु, रस्त्याची एक बाजू अजूनही वंचितच्या कार्यकर्त्यांनी रोखू धरली आहे. आता अतिरिक्त कुमक मागवून पोलीस वंचितच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
आणखी वाचा
वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत लवकरच सहभागी होणार, शरद पवार समावेशाबाबत अनुकूल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)