बारसकरांनंतर आता संगीता वानखेडे मैदानात, मनोज जरांगेंवर गंभीर आरोप, शरद पवारांचा हात असल्याचाही दावा
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असा आरोप संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत होत्या.
मुंबई : अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं. तिथे दंगल घडली का घडवली, सरकारने शोध लावावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असा आरोप संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी केला. संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत होत्या. मात्र त्यांनी आता फारकत घेतल्यानंतर, जरांगेंवर घणाघाती टीका केली.
संगीता वानखेडे काय म्हणाल्या?
मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हतं. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. १ ते १.५ महिन्यांपासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय.
मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते
टोपी घालून मनोज जरांगेंसोबत आम्ही आख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असं संगीता वानखेडे म्हणाल्या.
कोण आहेत संगीता वानखेडे? (Who is Sangeeta Wankhede)
- संगीता वानखेडे या पुण्यातील चाकणमधील आहेत
- फेसबुक प्रोफाईलवर त्यांनी संस्थापक अध्यक्ष स्री शक्ती संस्था महाराष्ट्र राज्य असं लिहिलं आहे
- संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात सहभागी होत्या
Sangeeta Wankhede on Manoj Jarange : संगीता वानखेडे नेमकं काय म्हणाल्या?
संबंधित बातम्या