एक्स्प्लोर
भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला कोविड वॉरियर्सकडून मोठं सामर्थ प्राप्त: नरेंद्र मोदी
आपण या लढ्यात सहभागी होवून लोकांचे प्राण वाचवावेत. पंतप्रधानांनी 'जन आंदोलन' ही मोहीम सुरू करून त्यात लोकांना सहभागाचे आवाहन केले.
![भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला कोविड वॉरियर्सकडून मोठं सामर्थ प्राप्त: नरेंद्र मोदी India's Covid fight people driven gets strength from Covid Warries भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला कोविड वॉरियर्सकडून मोठं सामर्थ प्राप्त: नरेंद्र मोदी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/13175036/Narendra-Modi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा लोकांनी चालवला आहे आणि त्याला कोविड वॉरियर्सकडून मोठे सामर्थ प्राप्त होतंय असे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी गुरुवारी सांगितले. कोरोनासंबंधी लोकांनी नियमांचे योग्य पालन करावे असे त्यांनी आवाहन केले.
त्यांनी लोकांना असेही आवाहन केले की लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करावे आणि आपण कोरोनाविरोधतील हा लढा जिंकणारच असा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगावा. बुधवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने असे सांगितले की येत्या काळातील दिवाळी, दसरा यासारखे सण, येता हिवाळी हंगाम आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून गुरुवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाकाळातील लोकांचे योग्य वर्तन कसे असावे यासंदर्भात 'जन आंदोलन' ही मोहीम सुरू करणार आहेत.
नरेंद्र मोदींनी यासंदर्भात एक ट्विट करून हे आवाहन केले. पंतप्रधान असेही म्हणाले की कोरोना विरोधातील लढ्यात लोकसहभागाने प्रमुख भूमिका बजावली असुन त्यामळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. आपण ही मोहीम पुढे चालू ठेवायला हवी आणि आपल्य़ा नागरिकांचे या व्हायरसपासून संरक्षण करायला हवे. असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी 'United2FightCorona' असे हॅशटॅग वापरले.
"चला कोरोना विरोधातील लढा एकत्रित लढू! नेहमी लक्षात ठेवा: मास्कचा वापर करा. हात स्वच्ठ धुवावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दो गज की दूरी ठेवा. आपण एकत्रित आलो तर यशस्वी होवू. आपण एकत्रित आलो तर कोरोनाविरोधातील लढा नक्कीच जिंकू." असे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हंटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या ही 68,35,655 लाख इतकी झाली आहे. तर 58,27,704 लोक या आजारातून बरे झाले आहेत. हा दर 85.02 इतका आहे. तसेच मृतांची संख्य़ा 1,05,554 इतकी झाली आहे.
जगातील प्रत्येकी दहापैकी एक लोकांना कोरोनाची लागण झाली असण्य़ाचा अंदाज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाच्य़ा प्रमुखांनी व्यक्त केले होतं. जगातील मोठ्या लोकसंख्येवर कोरोनाचा धोका अधिक गडद असल्याचेही ते म्हणाले होते.
संपूर्ण जग कोरोनावरील प्रभावी वॅक्सिनची वाट पाहत आहे. अशातच डब्ल्यूएचओने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
संबंधीत बातम्या :
धारावीतील कोरोना प्रसारावरचे नियंत्रण कौतुकास्पद: वर्ल्ड बँक
Coronavirus Vaccine | आनंदाची बातमी... वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस तयार होण्याची शक्यता : WHO
राज्याप्रमाणे देशातही कोरोनाबाधितांच्या संख्येत घट.. रोजचा आकडा 65 हजारांपेक्षा कमी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)