एक्स्प्लोर

Year Ender 2022: पंतप्रधान मोदी ते इलॉन मस्क, 'हे' आहेत 2022 मधील सर्वाधिक चर्चित चेहरे

Year Ender 2022: जगभरात असे अनेक लोक आहेत, जे या वर्षी चर्चेत होते. क्रीडा आणि चित्रपट जगतापासून ते राजकीय विश्वापर्यंत अनेकांची नावे यात सामील आहेत.

Year Ender 2022: जगभरात असे अनेक लोक आहेत, जे या वर्षी चर्चेत होते. क्रीडा आणि चित्रपट जगतापासून ते राजकीय विश्वापर्यंत अनेकांची नावे यात सामील आहेत. यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांचे. मस्क हे वर्ष 2022 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले. कधी ट्विटर विकत घेतल्याची चर्चा, कधी डील रद्द करण्याची चर्चा, तर कधी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक विचित्र आणि मोठे पाऊल उचलल्यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. इलॉन मस्क हे 239.6 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.   मस्क यांच्या व्यतिरिक्त 2022 मध्ये आणखी कोण-कोण होते चर्चेत हे जाणून घेऊ. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारताचेच नाही तर जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. भारतातील लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. भारताला पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध करण्यातही ते खूप यशस्वी झाले आहेत. पंतप्रधान मोदी गुंतवणूकदारांमध्येही खूप लोकप्रिय आहेत आणि भारतात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरत आहेत. याच कारणामुळे ते 2022 मध्येही चर्चेत राहिले आहेत. 

वोलोदिमीर झेलेन्स्की 

वोलोदिमीर झेलेन्स्की हे एक असे नाव आहे, जे 2021 पर्यंत भारतातील लोकांना कदाचित माहित नव्हते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असूनही ते फारसे लोकप्रिय नव्हते. मात्र फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांचे वक्तव्य समोर येऊ लागले. यानंतर जगभरातील लोकांना त्यांचं नाव माहित झालं. युद्ध सुरु झाल्यापासून ते सतत प्रसिद्धीच्या झोतात आला आहेत.

जॉनी डेप

जॉनी डेप आधीपासूनच खूप प्रसिद्ध अभिनेता आहे. तो लोकांमध्ये खूप लोकप्रिय देखील आहे. परंतु यावर्षी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्ड यांच्यातील वाद वर्षी खूप चर्चेत राहिला. दोघांमध्ये सुरू असलेला हा वाद लोकांना जवळून कळला असून त्यामुळे जॉनी डेपही चर्चेत राहिला.

राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधीही 2022 मध्ये खूप चर्चेत राहिले आहेत. भारत जोडो यात्रेसाठी ते पायी यात्रा करत आहेत. या यात्रेतील त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, जे लोकांना खूप आवडले आहेत. यातील बहुतांश फोटो लोकांना भावूक करणारे आहेत. या वर्षी ब्रिटनमध्ये दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून बराच वाद झाला होता. मोदींच्या काळात भारतीय परराष्ट्र सेवेत अहंकार निर्माण झाल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. भारतातील परिस्थिती चांगली नाही, भाजप आणि आरएसएसने संपूर्ण भारतात केरोसीन पसरवले असून केवळ ठिणगी पडण्याची गरज आहे, असे त्यांनी वक्तव्य केलं होतं.

नीरज चोप्रा

क्रीडा जगताबद्दल बोलायचे झाले तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे टोकियो ऑलिम्पिकचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याचे. या खेळाडूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. 2003 नंतर त्याने या चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. याआधी भारताला जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकच पदक मिळाले होते. 19 वर्षांनंतर 2022 मध्ये फक्त नीरजने या प्रकारात भारतासाठी दुसरे पदक आणले.

ऋषी सुनक

ऋषी सुनक हे वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत चर्चेत आले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीपासून ते थेट पंतप्रदान बनण्याचा त्यांचा प्रवास यावर्षी खूपच चर्चेत राहिला. यावर्षी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा ब्रिटनमधील 'लिस्ट ऑफ एशियन रिच 2022'मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget