World Cancer Day 2022 : जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास आणि त्याचं महत्व जाणून घ्या...
World Cancer Day 2022 : युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) ने जागतिक कर्करोग दिन हा एक "जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम" म्हणून घोषित केला आहे.
World Cancer Day 2022 : दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिवस' (World Cancer Day) साजरा केला जातो. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) ने जागतिक कर्करोग दिन हा एक "जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम" म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा आहे की, जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन रोग ओळखणे, काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, तसेच रूग्णांना भावनिक आधार देणे असा आहे.
या दिवसाबाबत तज्ञांचं मत आहे की, भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा हा आजार आहे. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविणे. तसेच, या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे असा आहे.
जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास :
4 फेब्रुवारी 2000 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे न्यू मिलेनियमसाठी जागतिक कर्करोग परिषदे दरम्यान झाली. त्याच दिवशी, युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक यांनी कॅन्सर विरुद्ध पॅरिसच्या चार्टरवर सही केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिवस' म्हणून साजरा केला जातो.
जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व :
जागतिक कर्करोग दिन मोहीम जागरूकता वाढविण्याचा आणि रोगाभोवती असलेला भ्रम काढून टाकण्याचा प्रयत्न करते. रोगासंबंधित आजार आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे, तसेच त्यातून होणारा अनावश्यक त्रास थांबवणे हे या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही या दिनाची मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येते.
महत्वाच्या बातम्या :
Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha