Women Reservation : महिला दिनी संसदेत महिलांना 50 टक्के आरक्षणाची मागणी
महिला दिनानिमित्त संसदेत आज प्रथम महिला खासदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात महिला सशक्तीकरण झालं, असं सरोज पांडे यांनी म्हटलं.
Women's Day : आंतरराष्ट्रीय महिलादिनी महिलांना 50 टक्के आरक्षणांची मागणी संसदेत करण्यात आली. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी महिलांना 50 टक्के आरक्षणाची मागणी केली. महिलांच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान भाजप खासदार सरोज पांडे यांनी म्हटलं की, मोदी सरकारच्या कार्यकाळात महिलांच्या हिताची अनेक कामं झाली. तर राजीव गांधी यांच्या कार्यकाळातही महिलांसंबंधी अनेक कामं झालं, असं काँग्रेसच्या खासदारांनी म्हटलं.
महिला दिनानिमित्त संसदेत आज प्रथम महिला खासदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. भाजप खासदर सरोज पांडे यांनी म्हटलं की, मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात महिला सशक्तीकरण झालं. भ्रूणहत्या आणि तिहेरी तलाक सारखे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, महिलांच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये. मोदींनी बेटी पढाओ आणि बेटी बचाओ सुरू केले ज्यामुळे महिलांचा दर्जा सुधारला. तर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं की, 24 वर्षापूर्वी आम्ही संसदेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला होता. आज 24 वर्षानंतर संसद आणि विधानसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे.
24 years ago, we proposed a 33% reservation for women in Parliament. Today, 24 years later, we should raise this to 50% reservation for women in Parliament and assembly: Shiv Sena MP Priyanka Chaturvedi, in Rajya Sabha#InternationalWomensDay pic.twitter.com/IpLkTZTdU6
— ANI (@ANI) March 8, 2021
राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनी म्हटंल की, अनेक अहवालात असे दिसून आले आहे की 6 टक्के पेक्षा जास्त महिला नेतृत्व करत आहेत. आपण याबद्दल विचार केला पाहिजे. आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन एक सुरुवात करू शकतो.
महिला दिन का साजरा केला जातो?
महिला दिन साजरा करण्याची परंपरा महिला कामगार चळवळीमुळे सन 1908 मध्ये सुरू झाली. या दिवशी न्यूयॉर्क शहरातील 15,000 महिलांनी नोकरीचे तास कमी करण्यासाठी, चांगल्या पगाराची मागणी आणि इतर काही अधिकारांच्या मागण्यांसाठी निदर्शने केली. त्यानंतर एका वर्षांनंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने हा दिवस पहिला राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. 1910 मध्ये कोपेनहेगन येथे महिला कामगारांची एक आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. त्यात हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं आणि हळूहळू हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून लोकप्रिय झाला. 1975 मध्ये खऱ्या अर्थाने हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून ओळखला गेला जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने थीमसह हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.