International Women’s Day 2021 : महिला दिनी सरकारची मोठी घोषणा, महिलांसाठी राज्यभर स्वतंत्र लसीकरण केंद्र
International Women’s Day 2021 : महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्र करणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागानं माहिती दिली आहे.
![International Women’s Day 2021 : महिला दिनी सरकारची मोठी घोषणा, महिलांसाठी राज्यभर स्वतंत्र लसीकरण केंद्र International Womens Day 2021 : Corona Vaccination Centers in each district in Maharashtra are only for women on the occasion of Women's Day International Women’s Day 2021 : महिला दिनी सरकारची मोठी घोषणा, महिलांसाठी राज्यभर स्वतंत्र लसीकरण केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/17232203/Vaccination.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
International Women’s Day 2021 : महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्र करणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागानं माहिती दिली आहे. राज्यात फक्त महिलांसाठी 189 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी पाच विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याठिकाणी फक्त महिलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात अशी एकूण 189 महिला विशेष केंद्र सुरू असून त्यातील सर्वाधिक 19 केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत.
राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ गेल्या काही दिवसात देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येतंय. राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळालं असं वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून रविवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 11,141 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 97,983 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच 11 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान शहरातील सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली आहे. या दरम्यान लग्न समारंभावरही बंदी आणण्यात आली आहे. औरंगाबादल शहरात 4264 इतक्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येचा दर हा 93.17 इतका आहे तर मृत्यू दर हा 2.36 इतका आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या ही 22,19,727 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52,478 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 1,361 रुग्ण सापडले असून शहरातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 3,35,569 इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)