(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breast Cancer: पुन्हा स्तनाचा कर्करोग होणार नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी विचारा 'हे' सहा प्रश्न; काळजी नको!
Health Tips: स्तनाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर महिलांसाठी चिंताजनक विषय आहे, अशा स्थितीत काळजी घेण्यासाठी डॉक्टरांशी योग्य संवाद साधणं महत्त्वाचं आहे.
Health Tips: स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. प्रत्येकी 30 बायकांमध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा महिलांमधील सर्वात घातक आजार आहे. उपचारानंतरही 5 वर्षांत हा आजार पुन्हा होऊ शकतो. अल्पावधीत दीर्घकाळापर्यंत हा आजार पुन्हा होऊ शकतो. 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवल्याचे दिसून येते. हा आजार पुन्हा होणं म्हणजे सर्वकाही संपलं, असा अर्थ होत नाही.
या आव्हानात्मक काळादरम्यान निदान, उपचार आणि पुढील पर्याय समजण्यासाठी डॉक्टरांसोबत खुल्या मनाने संवाद साधणं महत्त्वाचं आहे. यावेळी तुम्ही डॉक्टरला काही प्रश्न विचारले पाहिजे, जेणेकरुन तुम्हालाही कर्करोग किती प्रमाणात आहे, याची माहिती मिळेल आणि त्यावर योग्य उपचार घेता येतील. केमोथेरपीपलीकडील नवीन प्रगत थेरपींबाबत देखील तुम्ही माहितीपूर्ण चर्चा करू शकता.
मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, विशेषत: शहरी भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. रूग्णांना उपलब्ध उपचारांबाबत माहित असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी डॉक्टरांशी उपचार पर्यायांबाबत खुल्या मनाने, सखोलपणे चर्चा करता आली पाहिजे. महत्त्वाचे आहे. आधुनिक पोस्ट-ऑपरेटिव्ह क्यूरेटिव्ह उपचार रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा करू शकतात, जवळपास 10 ते 20 टक्के रूग्णांमध्ये पुन्हा आजार होण्याचा धोका कमी करू शकतात.
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) झालेल्या रुग्णांना डॉक्टरांशी संवाद साधण्यास मदत करणारे प्रश्न पाहूया.
डॉक्टरांना विचारा हे 6 प्रश्न
1. स्तनाच्या कर्करोगाचा टप्पा कोणता आहे आणि त्याचा अर्थ काय?
योग्य उपचार योजना आखण्यासाठी स्तनाच्या कर्करोगाचा टप्पा माहित असणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांना कर्करोगाचा टप्पा, कर्करोगाच्या गाठीचा आकार, जवळचे लिम्फ नोड्स किंवा ते शरीराच्या इतर भागांवर पसरेल का आणि त्याच्या संभाव्य परिणामांबाबत स्पष्टपणे विचारा. कर्करोगाच्या टप्प्याबाबत माहिती असल्यास तुम्ही आजारावर आणि पुन्हा आजार होऊ नये, यासाठी योग्य उपचार घेऊ शकता.
2. उपलब्ध उपचाराचे पर्याय कोणते?
तुमच्या विशिष्ट स्तनाच्या कर्करोगासाठी उपलब्ध उपचार पर्यायांबाबत चौकशी करा. डॉक्टरांना उपचाराचे पर्यायाचे, त्यातल्या जोखीम आणि उपचाराचे संभाव्य दुष्परिणाम विचारा. तसेच केमोथेरपीपलीकडील नुकत्याच प्रगत उपचारांबाबत विचारा. सध्या अनेक प्रगत उपचार आहेत, जे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत जीवन जगण्यास, तसेच आजार पुन्हा न होण्याची खात्री देत सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत करू शकतात.
3. आजार पुन्हा होण्याचा धोका काय आहे आणि पुन्हा झालेल्या आजाराचा प्रकार कोणता?
सर्जरीनंतर किंवा उपचारांनंतर कर्करोग पुन्हा झाल्यास त्याचा टप्पा कोणता आहे, या आधारावर
आजार पुन्हा होण्याचा धोका समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुन्हा झालेला आजार हाडं, यकृत किंवा फुफ्फुस यांसारख्या शरीराच्या इतर भागांपासून लोकल किंवा डिस्टण्ट मेटास्टॅसिस असू शकतो. स्तनाच्या कर्करोगाचा प्रकार आणि टप्प्यानुसार धोक्यामध्ये बदल होऊ शकतो. ही माहिती माहित असल्यास पुढील निर्णय घेण्यास मदत होईल.
4. शिफारस केलेला उपचार जीवनाचा दर्जा कायम राखेल/सुधारेल का?
जीवनाच्या दर्जावर उपचाराच्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करणं महत्त्वाचं आहे. शिफारस केलेल्या उपचाराचा तुमच्या दैनंदिन क्रियाकल्प, शारीरिक स्वास्थ्य, भावनिक आरोग्य आणि जीवनाच्या दर्जावर काय परिणाम होईल, याबाबत डॉक्टरांना विचारा. उपचारादरम्यान तुमचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपचाराशी संबंधित दुष्परिणाम आणि ते सुधारण्याच्या धोरणांबाबत चौकशी करा.
5. सहाय्यक केअर सेवा उपलब्ध आहेत का?
स्तनाच्या कर्करोगाचा सामना करणं शारीरिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतं. हेल्थकेअर केंद्राद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सहाय्यक केअर सेवांबाबत चौकशी करा. यामध्ये बहुआयामी टीमच्या उपलब्धतेचा समावेश असू शकतो, जसे ऑन्कोलॉजी नर्सेस, सामाजिक कार्यकर्ते, सायकोलॉजिस्ट्स, न्यूट्रिशनिस्ट्स, पॅलिएटिव्ह केअर स्पेशालिस्ट्स. सहाय्यक केअर सेवा तुमचा व्यवस्थापन प्रवास कार्यक्षमपणे नेव्हिगेट करण्यास
मदत करण्यासाठी मार्गदर्शन, भावनिक पाठिंबा, लक्षणांवर व्यवस्थापन आणि संसाधने प्रदान करू शकतात.
6. दीर्घकालीन परिणाम आणि वाचण्याची स्थिती काय आहे?
डॉक्टरांसोबत स्तनाच्या कर्करोगाचे दीर्घकालीन परिणाम आणि वाचण्याच्या स्थितीबाबत चर्चा करा. भविष्यात पुन्हा आजार होण्याची शक्यता, देखरेख, फॉलो-अपची गरज आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठीच्या धोरणांबाबत विचारा. व्यायाम, आहार आणि तणाव व्यवस्थापन अशा जीवनशैली बदलांबाबत चौकशी करा, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.
स्तनाच्या कर्करोगाचे निदान करताना डॉक्टरांसोबत खुल्या मनाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करणं महत्त्वाचं आहे. वर उल्लेख करण्यात आलेले प्रश्न आजार पुन्हा होण्याचा धोका, उपचारांचे पर्याय, सहाय्यक केअर सेवांची उपलब्धता आणि दीर्घकालीन परिणाम यांबाबत स्पष्ट माहिती मिळवण्याचा सुरूवातीचा टप्पा आहे. कर्करोगाच्या या प्रवासात तुम्ही एकटे नाही आणि यामध्ये मदत करण्यासाठी तुम्हाला पाठबळ मिळू शकते, हे लक्षात ठेवा.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )