एक्स्प्लोर
कोट्यधीश पती, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि एक हत्या
सुरत : सुरतमधील एका धनाढ्य व्यक्तीची घरात घुसून हत्या आणि लूट झाल्यामुळे शहरात खळबळ माजली होती. घरात पत्नी आणि लेक असतानाच या व्यावसायिकाची काही जणांनी सुरा खुपसून हत्या केली. मात्र लुटमारीच्या दिशेने तपास सुरु असतानाच पोलिसांना एक वेगळाच धागादोरा सापडला. या प्रकरणाची उकल करुन त्यांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
तीन वर्षांपूर्वी आरोपी तरुणी वेल्सीचा विवाह कोट्यधीश व्यावसायिक दिशीतशी झाला. नवऱ्याचं जीवापाड प्रेम, अगणित पैसा, आणि पदरात दीड वर्षांची मुलगी... तसं पाहता तिला कसलीच कमतरता नव्हती. पण तिच्या मनात कोणी दुसराच भरला होता.
सुरतच्या पॉश पार्ले पॉइंट परिसरात 27 जूनला एक हत्याकांड घडलं. व्यावसायिक दिशीत जरीवाला यांची काही जणांनी घरात घुसत सुऱ्याने खुपसून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिशीतची पत्नी वेल्सीने पोलिसांसमोर रडून रडून आकांडतांडव केला.
तिच्या माहितीनुसार रात्री 9.45 वाजता घराची बेल वाजली. दिशीत यांनी दरवाजा उघडला, तर काही सशस्त्र गुंडांनी घुसखोरी केली. आधी वेल्सीच्या हातातली सोन्याची अंगठी आणि चेन त्यांनी काढायला लावली आणि नंतर मायलेकींना बाथरुममध्ये बंद केलं. त्यानंतर सुऱ्याने पोटात खुपसून दिशीतची हत्या केली आणि तिजोरी तोडून दागिन्यांसह पोबारा केला.
लुटारु गेल्यानंतर वेल्सीने बाथरुमची काच तोडून आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यांना बोलावलं. तेव्हा सर्वांना दिशीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. इतकंच नाही, तर दिशीतची कार घेऊन लुटारुंनी पळ काढल्याचंही समोर आलं.
वेल्सीचा जबाब नोंदवताना पोलिसांना मात्र संशय येत होता. यामागे लुटमार नसून दुसरी कहाणी लपल्याचं पोलिसांनी हेरलं. तिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावरही ती पोलिसांची दिशाभूल करत राहिली. मात्र अखेर तिने आपल्या कृत्यांची कबुली दिली.
लग्नापूर्वी तिचे सुकेतू नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र दोघांच्याही घरुन लग्नाला पसंती नसल्यामुळे दोघांचं लग्न वेगवेगळ्या ठिकाणी लावून देण्यात आलं. मात्र वेल्सी आणि सुकेतूच्या मनात प्रेम जिवंत होतं. पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गात दिशीत हा मोठा अडथळा होता.
अखेर दोघांनी दिशीतला संपवण्याचा आणि त्याची संपत्ती लुबाडण्याचा निर्णय घेतला. दिशीतचे आई-वडिल परदेशी फिरायला गेल्याची संधी साधून त्यांनी लूट आणि हत्येचा कट रचला. यात वेल्सीच्या ड्रायव्हरलाही सहभागी करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांनी वेल्सी, सुकेतूसह ड्रायव्हरलाही अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement