एक्स्प्लोर

Coal Shortage : वर्षानुवर्षे असलेलं वीज संकट मोदी सरकारला का सोडवता येत नाही? 

Coal Shortage : देशभरात कडाक्याच्या उन्हात गेल्या आठवड्यात तीन वेळा वीजपुरवठा विक्रमी पातळीवर पोहोचला. मंगळवारी सर्वाधिक वीज मागणी विक्रमी 201.65  GW वर पोहोचली आहे

Coal Shortage : देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेचे संकटअधिकच गडद होत आहे. 14 हून अधिक राज्यांतील लोक वीज संकटामुळे त्रस्त आहेत. केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारांनाही वीज संकटाची चिंता आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रासलेले लोक आता सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. 

याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी वीज संकटाच्या सद्यस्थिती बाबत संबंधित विभागांच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा मंत्री आरके सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी सहभागी झाले होते. विजेचे संकट रोखण्यासाठी ऊर्जा, कोळसा आणि रेल्वे मंत्रालयाची सक्रियता शिगेला पोहोचली आहे. 

पॉवर प्लांट्सना कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी, कोल इंडिया लिमिटेड उत्पादन वाढवण्यासोबतच रेल्वे मंत्रालयाशी जवळून काम करत आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी मे-जून महिन्यात कोळशाचे संकट का गडद होते, असा प्रश्न उपस्थित होतो. 

पाच वर्षे जुने वीज संकट कधी संपणार?

देशभरात कडाक्याच्या उन्हात गेल्या आठवड्यात तीन वेळा वीजपुरवठा विक्रमी पातळीवर पोहोचला. मंगळवारी सर्वाधिक वीज मागणी विक्रमी 201.65  GW वर पोहोचली. 7 जुलै 2021 रोजी ते 200.53 GW होते. गुरुवारी विजेची कमाल मागणी 204.65 GW च्या विक्रमी उच्चांकावर होती आणि शुक्रवारी 207.11 GW च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. बुधवारी ही मागणी 200.65 GW होती.

भारतातील वीज संकटाची कहाणी पाच वर्षे जुनी आहे

देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी वीज संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील विजेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. आपण सर्वांनी मिळून यावर लवकरच तोडगा काढावा. आत्तापर्यंत आम्ही दिल्लीत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मॅनेज होतो. या समस्येवर तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

संपूर्ण देशात कोळशाची तीव्र टंचाई असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रेल्वे रेकचा अभाव आणि कोळशाच्या पुरवठ्यातील प्रचंड तुटवडा हे याचे सर्वात मोठे कारण आहे. कोळशाच्या या तीव्र टंचाईमुळे देशभरातील सर्व वीज प्रकल्पांना वीज निर्मिती बाबत अडचणी येत आहेत. कारण, वीज साठवून ठेवता येत नाही, वीजनिर्मिती केंद्रांमध्ये दररोज वीज निर्माण होते. त्यामुळे विजेच्या बॅकअपसाठी ते बनवणाऱ्या इंधनाचा बॅकअप घेणे आवश्यक आहे. सध्या हे इंधन कोळसा आहे, ज्याचा पुरवठा देशभरात कमी झाला आहे.

CCL कोणाला जबाबदार धरते?

सीसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोळसा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. जिथे आधी ट्रेनमध्ये 450 रेक होते, आता फक्त 405 आहेत. तर त्यांची संख्या वाढायला हवी होती, मात्र नेमके उलटे घडत आहे. आता हे रॅक कमी झाले आहेत.

विजेची मागणी किती टक्क्यांनी वाढली

सन 2017-18 पासून देशातील विजेचे संकट काही महिन्यांपासून गंभीर होत आहे. या काळात पीक अवरची मागणी २४ टक्क्यांनी वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कालावधीत पीक अवरची मागणी 1.64 लाख मेगावॅटवरून दोन लाख मेगावॅटपर्यंत वाढली आहे, परंतु या काळात देशातील वीजनिर्मिती 1308 अब्ज युनिट्सवरून केवळ 1320 अब्ज युनिटपर्यंत वाढली आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget