एक्स्प्लोर

करुणानिधी यांच्या निधनानंतर DMK ची धुरा कुणाच्या खांद्यावर?

करुणानिधी जवळपास पाच दशकं डीएमकेचे प्रमुख होते. त्यांच्या निधनानंतर अर्थात डीएमकेच्या आगामी प्रमुखाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.

चेन्नई : डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झालीय ती डीएमकेची धुरा कुणाच्या खांद्यावर दिली जाणार? खरंतर करुणानिधी यांनी आपल्या हयातीतच एम के स्टॅलिन यांच्याकडे एकप्रकारे पक्षाची जबाबदारी सोपवली होती. मात्र तरीही आता डीएमकेचा सर्वेसर्वा होण्याचा मान कुणाला मिळणार, हा प्रश्न उरतोच. करुणानिधी जवळपास पाच दशकं डीएमकेचे प्रमुख होते. त्यांच्या निधनानंतर अर्थात डीएमकेच्या आगामी प्रमुखाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झालीय. एम के अलागिरी आणि एम के स्टॅलिन या करुणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. अलागिरी हे माजी मंत्री असून, त्यांना 2014 साली पक्षातून काढण्यात आले होते. त्यामुळे नेतृत्त्वाचा आगामी संघर्ष सुद्धा दोघांमध्ये असेल का? असाही एक प्रश्न उपस्थित केला जातोय. काही वर्षांपूर्वी डीएमकेच्या आगामी नेतृत्त्वाबद्दल चर्चा झाली आहे. त्यावेळी एकदा अलागिरींनी म्हटले होते की, "डीएमके मठ आहे का, जेणेकरुन तिथे महंत आपला वारसदार निवडेल." अर्थात, त्यावेळी अलागिरींनी दस्तुरखुद्द करुणानिधी यांच्यावरच निशाणा साधला होता. मात्र त्यानंतर अलागिरी यांना पक्षातून काढण्यात आले आणि ते राजकारणापासून काहीसे दूरच राहिले. मात्र, करुणानिधी जेव्हा चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये भरती होते, त्यावेळी अलागिरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत कावेरी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. “डीएमकेमध्ये राजकीय वारसदारासाठी संघर्ष होण्याची कोणतीच शक्यता नाही. कारण करुणानिधी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत करुणानिधी यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. या दरम्यान कुटुंबातील प्रत्येकजण एकमेकांशी सुसंवाद साधत होते.”, असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर डीएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मात्र, राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार श्याम षणमुगम हे डीएमकेच्या नेत्यांशी सहमत नाहीत. त्यांच्या मते, “डीएमकेच्या नेतृत्त्वासाठी आता संघर्ष सुरु होईल. भावांमधील लढाई संपणार नाही. स्टॅलिन यांनाच सर्वसमावेशक राजकारण करावं लागेल. अन्यथा, प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्याचा भाजपचा अजेंडा असून, डीएमकेला कमकुवत करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. कारण आता करुणानिधीही हयात नाहीत.” दरम्यान, डीएमके तामिळनाडूच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे. अनेक वर्षे या पक्षाने राज्याची सत्ताही उपभोगली आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे डीएमकेच्या प्रमुखाला राज्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अर्थात डीएमकेच्या प्रमुखपदावरुन संघर्ष झाल्यास आश्चर्य वाटायला नको. डीएमकेची सूत्र पूर्णपणे कुणाच्या हातात जातील, हे आगामी काळात कळेलच. संबंधित बातम्या : करुणानिधी अनंतात विलीन, मरिना बीचवर अंत्यसंस्कार ...म्हणून करुणानिधी कायम काळा चष्मा लावायचे! करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात, मरिना बीचचं महत्त्व काय? करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार! सिनेमा ते सीएम... करुणानिधी यांचा राजकीय प्रवास तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Embed widget