एक्स्प्लोर

जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशीकला कोण?

चेन्नई/नवी दिल्ली : कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच जयललितांचं निधन झालं. लोकसभेत 39 तर राज्यसभेत 18 खासदार असलेल्या पक्षाचं पुढे काय होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. पनीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असलं तरी पक्षाची धुरा मात्र जयललितांची परममैत्रिण शशीकला नटराजन यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. कोण आहेत शशीकला? शशीकला नटराजन....जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती...या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही...कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं...तर कुणी...लिव्ह इन कम्पॅनियनही... पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची... आजवर पडद्याआड वावरणारी शशीकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. शशीकला आणि जयललितांची ओळख कशी? 1970 च्या सुमारास शशीकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशीकला नटराजन हिचा पती पीआरओ म्हणून काम करत होता. आणि तो ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होता, तो जयललितांच्या जवळ होता. एका व्हिडिओ शुटिंगच्या निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशीकलानं जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच ती जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनली. एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशीकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशीकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30-35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले....एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं. जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली....पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती शशीकला. शशीकलाच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी हे तर शशीकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे. शिवाय 1995 साली शशीकलानं आपला भाचा सुधाकरन जयललिलांना दत्तकपुत्र म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटीव्ह बनत चालली. बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशीकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशीकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशीकलाचा कळवळा आला, आणि त्यांनी तिला माघारी बोलावलं. आता शेवटच्या श्वासापर्यंत शशीकला त्यांच्यासोबतच राहिली. जयललिता आजारी पडल्यापासूनच सगळ्यांना माहिती होतं की भविष्यात सगळा कारभार शशीकलाकडेच असणार...फक्त ती किंगमेकरची भूमिका पसंत करणार की स्वतःच किंग बनायला सरसावणार इतकाच प्रश्न होता. तूर्तास तरी तिनं पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली आहे. पण पनीरसेल्वम आणि शशीकला यांचे संबंध तितकेसे मधुर नाहीत. शिवाय जो करिष्मा, लोकप्रियता, लोकल टच जयललितांचा होता, तितका शशीकलाचा नाही. त्यामुळे ती किती घट्टपणे पक्षावर आपली कमांड ठेवू शकणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. शशीकला पुष्पा नावाची आणखी एक डीएमके खासदार आहे. तिच्यासोबत नुकतंच भांडण झालेलं आणि तिला हाकलून दिलं होतं. मात्र त्या शशीकलाचा याच्याशी काहीही संबंध नाही. जयललिता निघून गेल्यात, तर करुणानिधींचीही प्रकृती खालावली आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात भविष्यात एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ही पोकळी भरुन काढण्यासाठी राष्ट्रीय पक्ष घारीसारखे टपून बसले असतील.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget