Coronavirus: अमेरिकेची भारताला महामदत; एका आठवड्यात करणार 7.4 अब्ज रुपयांच्या साहित्याचा पुरवठा
भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून येत्या आठवडाभरात अमेरिकेतून भारताला कोरोनाशी संबंधित 7.41 अब्ज रुपयांच्या साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अमेरिकेनेही या कामाता आता पुढाकार घेतला असून येत्या आठवड्यात भारताला 7.41 अब्ज रुपयांच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
The United States is delivering emergency COVID-19 supplies worth more than $100 million in the coming days to support our partners in India. https://t.co/nKBTvGH8zM
— National Security Council (@WHNSC) April 28, 2021
भारताच्या या कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये अमेरिका भारताला शक्य तितकी मदत करेल आणि भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असं व्हाईट हाऊसच्या एका निवेदनात सांगण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताला या आठवडाभरात 7.41 अब्ज रुपयांच्या कोरोना संबंधित साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये 1000 ऑक्सिजनचे सिलेंडर, 1.5 कोटी N-95 मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या यांचा समावेश आहे.
Thanks to @US_TRANSCOM, @AirMobilityCmd, @Travis60AMW & @DLAmil for hustling to prepare critical @USAID medical supplies for shipping. As I've said, we’re committed to use every resource at our disposal, within our authority, to support India’s frontline healthcare workers. pic.twitter.com/JLvuuIgV46
— Secretary of Defense Lloyd J. Austin III (@SecDef) April 29, 2021
भारतासाठी दोन कोटी लसींची निर्मीती करण्याचे अॅस्ट्राझेनेकाला निर्देश
व्हाईट हाऊसने अमेरिकन लस उत्पादक कंपनी असलेल्या अॅस्ट्राझेनेकाला निर्देश दिले आहेत की, लवकरात लवकर कोरोनाच्या अतिरिक्त लसींचे उत्पादन करावं आणि ते भारताला पाठवावं. भारताला मदत करण्यासाठी अमेरिकेने अॅस्ट्राझेनेकाला दोन कोटीपेक्षा अधिक लसींचे उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Cases Today : देशात पहिल्यांदाच एका दिवसात 3.79 लाख नव्या रुग्णांची नोंद, तर 3645 रुग्णांचा मृत्यू
- Tripura: त्रिपुरातील जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव निलंबित, लग्न कार्यात घुसून लोकांशी गैरवर्तन करणं भोवलं
- Lockdown In Goa: गोव्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद