Tripura: त्रिपुरातील जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव निलंबित, लग्न कार्यात घुसून लोकांशी गैरवर्तन करणं भोवलं
पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश यादव (DM Shailesh Yadav) यांनी संचारबंदी असताना सुरू असलेल्या एका लग्न कार्यातील लोकांवर कारवाई केली होती.ही कारवाई करताना त्यांनी महिलांशी आणि उपस्थित लोकांशी गैरवर्तन केलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

त्रिपुरा: संचारबंदी सुरू असताना एका लग्न कार्यात घुसून सिंघम स्टाईलने कारवाई करणे पश्चिम त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगलट आलं आहे. कारवाई करताना जमलेल्या लोकांशी गैरवर्तन केल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसे आदेश त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी दिले आहेत.
संबंधित कारवाई करताना जिल्हाधिकारी शैलेश कुमार हे लग्नासाठी जमलेल्या लोकांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. काही लोकांना त्यानी स्वत: मारल्याचं या व्हिडीओत कैद झालं आहे. उपस्थित महिलांशी उर्मट भाषेत बोलताना, कोणतीही महिला पोलीस सोबत नसताना त्या महिलांना अटक करण्याचा आदेश देत असल्याचंही ते दिसतात. या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी काही लोकांना मारल्याचंही व्हिडीओत कैद झालं आहे.
The district magistrate raided the weeding at night curfew.
— Shyamali Tripura (@ShyamaliTripura) April 27, 2021
@ajitanjum @pankajjha_ @RubikaLiyaquat @chitraaum @manogyaloiwal @Abhinav_Pan @AnchorDeepika @TheLallantop pic.twitter.com/4ezjDyYFMx
काय आहे प्रकरण?
त्रिपुरा पश्चिमचे जिल्हाधिकारी डॉ. शैलेश कुमार यादव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्रीच्या संचारबंदीचे नियम लागू असतानाही विवाहसोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या दोन ठिकाणांवर धाड टाकली. सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी ही कारवाई करण्यात आली. यादव यांनी भारतीय दंड संविधान अंतर्गत येणाऱ्या कलम 144 मधील नियमांची पायमल्ली होत असल्याचं कारण पुढे करत ही कारवाई केली. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, धाड टाकण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणाहून 31 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 19 महिलांचाही समावेश आहे. सदर समारंभांची माहिती मिळताच संचारबंदीच्या नियमांचं पालन होत नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत यादव यांनी या कार्यक्रमांवर धाड टाकली. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि लहान मुलं एकत्र आली होती.
सोशल मीडियावर सध्या या कारवाईचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जिल्हाधिकारी वराला आणि इतरांना पोलिसांनी ताब्यात घ्यावेत असा आदेश देत आहेत. "ही सर्व मंडळी उच्चशिक्षित आहेत. तरीपण ते नियमांचं पालन करत नाहीत. ही तीच माणसं आहेत जी दुसऱ्या बाजूला सरकार काहीच करत नाही म्हणून आरोप करत असतात सदर प्रकरणाची कल्पना असूनही कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत" असं यादव घटनास्थळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
