एक्स्प्लोर
Advertisement
भारतासह या 15 देशात संरक्षणमंत्रीपदी महिला!
श्रीलंकेने पहिल्यांदाच 1960 साली श्रीमावो भंडारनायको यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची धुरा दिली होती. त्यानंतर 1980 साली इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर अगदी काही वेळातच खातेवाटपालाही सुरुवात झाली आहे. दिग्गजांची खाती बदलल्याचे खातेवाटपावरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधीनंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संरक्षण मंत्रीपदी महिलेची वर्णी लागली आहे. निर्मला सीतारमन यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रिपदाच्या धुरा सोपवण्यात आली आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिलेच्या खांद्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र जगभरातही विविध देशांच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदार महिला मंत्र्यांच्याच खांद्यावर आहे.
श्रीलंकेतून याची सुरुवात झाली होती. श्रीलंकेने पहिल्यांदाच 1960 साली श्रीमावो भंडारनायको यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची धुरा दिली होती. त्यानंतर 1980 साली इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. शिवाय सध्या भारतासह ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रांस, ऑस्ट्रेलिया यांच्यासह 15 देशांच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी महिलेच्या खांद्यावर आहे.
- बांगलादेश - शेख हसीना (पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री)
- फ्रान्स - फ्लोरेंस पार्ली
- स्पेन - मारिया डोलोरेस दि कोस्पेदाल
- ऑस्ट्रेलिया - मरीस ए पेन
- इटली - रॉबर्टा पिनोट्टी
- दक्षिण आफ्रिका - नॉसिव्हीव मॅपिसा
- रिपब्लिकन ऑफ मॅसिडोनिया - रादमिला सेकेरिंस्का
- स्लोव्हेनिया - एंद्रेजा कटिक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement