क्रिप्टोकरन्सीबाबत व्हॉट्सअपची मोठी घोषणा
नोवी हे मेटा कंपनीचे डिजिटल वॉलेट देखील आहे. व्हॉट्सअॅपने हे फिचर केवळ ठराविक लोकांसाठी सुरु देखील केलं आहे.
मुंबई : चॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला डिजिटल प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने क्रिप्टोकरन्सी बाबत एक मोठी घोषणा केली आहे. ज्याचा फायदा जगभरातील व्हॉट्सअप युजर्सला होण्याची शक्यता आहे. चॅटिंग, व्हिडिओ कॉलसाठी व्हॉट्सअप लोकप्रिय आहे. परंतु व्हॉट्सअप पेमेंट सेवा जगभरात अतिशय संथ गतीने सुरू होत आहे. यालाच गती मिळावी म्हणून येत्या काळात युजर्सना एकमेकांना व्हॉट्सअॅपवरून क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर करू शकतील अशी माहिती कंपनीने दिली आहे.
9to5mac.com च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ड आणि नोव्हीचे सीईओ स्टीफन कासरील यांनी याची एकत्रितपणे घोषणा केली. नोवी हे मेटा कंपनीचे डिजिटल वॉलेट देखील आहे. व्हॉट्सअॅपने हे फिचर केवळ ठराविक लोकांसाठी सुरु देखील केलं आहे, म्हणजेच ज्या लोकांपर्यंत हे फिचर अपडेट झालं आहे ते या मेसेंजर अॅपद्वारे पैसे पाठवू आणि प्राप्त करु शकत आहेत.
नोवीच्या वेब पेजवर काय?
नोवीच्या वेब पेजनुसार, ही सेवा पैसे पाठवण्याचा आणि प्राप्त करण्याचा एक नवीन मार्ग आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे त्या युजरला 'व्हॉट्सअॅप चॅट न सोडता' पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते.
आता मेटा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारेही क्रिप्टोकरन्सी पेमेंट करण्याची योजना घोषित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार एक कंपनी 'स्टेबलकॉइन' ( ‘stablecoin’) वर काम करत आहे. जाणकारांच्या मते कंपनी एक स्टेबलकॉइन ( ‘stablecoin’) विकसित करत आहे जे की एक प्रकारचे डिजिटल चलन असेल, ते यूएस डॉलरला पेग केले जाईल आणि यात खूपच कमी अस्थिरता असेल. दरम्यान हे लोक कंपनीच्या अंतर्गत योजनेवर चर्चा करण्यासाठी अधिकृत नाहीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :