एक्स्प्लोर

असं काय झालं, ज्यामुळे वाजपेयी गेली नऊ वर्ष अंथरुणाला खिळून आहेत?

वाजपेयींना झालेला जो मूळ आजार आहे तो डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश... ज्यामुळे 2009 सालापासूनच ते रुग्णशय्येवर खिळलेले आहेत.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर सध्या दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये उपचार सुरु आहेत. वाजपेयींना मूत्रसंसर्ग म्हणजे यूरिन इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. पण त्यांना झालेला जो मूळ आजार आहे तो डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश... ज्यामुळे 2009 सालापासूनच ते रुग्णशय्येवर खिळलेले आहेत. यूरिन इन्फेक्शन दूर होईपर्यंत वाजपेयींना रुग्णालयातच ठेवलं जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. वाजपेयींना तुम्ही-आम्ही जाहीर कार्यक्रमांत पाहून आता जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. 2009 सालापासून ते अंथरुणाला खिळून आहेत. सभा, मैफली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा हा नेता अचानक समाजापासून एकाकी पडला. तब्बल एक दशक त्यांना असं बेडवर पडून  काढावं लागतंय. या अफाट व्यक्तिमत्वाला ज्या आजाराने जखडलंय त्या आजाराचं नाव आहे डिमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंश... काय आहे डिमेन्शिया? डिमेन्शिया पीडित रुग्णांमध्ये आढळणारं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे शॉर्ट मेमरी लॉस. वयाची साठी ओलांडली की डिमेन्शियाची शक्यता बळावत जाते. वयपरत्वे माणसाची स्मरणशक्ती कमीच होते. पण अलजायमर या मेंदूशी निगडीत रोगामुळे डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. अलजायमरमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्यात डिमेन्शियाची भर पडली की परिस्थिती गंभीर बनते. अशा रुग्णाला सतत निगराणीखाली ठेवण्याची आवश्यकता असते. डिमेन्शियामधला स्मृतीभ्रंश हा अनेकदा घातक ठरतो. तुम्ही माणसाची नावं विसरता, तुम्ही परिचित ठिकाणंही विसरता इतपर्यंत ठीक आहे. पण अनेक केसेसमध्ये माणसं पुन्हा घरी यायचं देखील विसरतात, असं दिशाहीन भटकत असतानाच डिमेन्शिया पेशंटचे अपघाती मृत्यू अधिक झालेले आहेत. दिल्लीतल्या मनोहर लाल शर्मा यांची केसतर याबाबतीत फार भयानक आहे. पाच दिवस घराबाहेर भटकल्यानंतर डिहायड्रेशनमुळेच त्यांचा मृत्यू झाला. कारण, पाणी प्यायची आठवण सुद्धा त्यांना राहिली नाही. त्यामुळे आजार साधा दिसत असला तरी कधीकधी तो इतकं भयानक रुप घेतो. सरकारी पातळीवर डिमेन्शियाकडे दुर्लक्ष सरकारी पातळीवर अजूनही या आजाराला फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. डिमेन्शिया पीडीत रुग्णांसाठी देशात जे सात डे केअर सेंटर आहेत, त्यांना 2015-16 या एकूण वर्षभरात सरकारकडून मिळालेला निधी होता केवळ 66 लाख रुपयांचा. व्यक्तीची मेंटल स्थिती बिघडणं आणि डिमेन्शिया यात एक बारिक फरक आहे. पण तो ओळखता न आल्यामुळे अनेकदा व्यक्तीवर उपचारही होत नाहीत. 2004 साली सत्ता गेल्यानंतरच वाजपेयींचा जाहीर कार्यक्रमांमधला वावर कमी झाला होता. पण 2009 सालानंतर तो जवळपास पूर्णपणे बंद झाला. तीन वर्षांपूर्वी 2015 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी स्वत: वाजपेयींच्या घरी गेले होते. दिल्लीतल्या कृष्णमेनन रोडवर वाजपेयींचं निवासस्थान आहे. या ठिकाणी वाढदिवसाच्या वेळी काही नेते त्यांना भेटायला येतात, पण ही भेट काहीशी एकतर्फी असते. कारण, बाकी शरीरातले अवयव सुरळीत असले तरी वाजपेयी मानसिकदृष्ट्या कुठला प्रतिसाद देऊ शकत नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget