एक्स्प्लोर

Weekly Recap : पंतप्रधानांचा अमेरिका दौरा, शिवसेनेचा वर्धापन दिन ते दर्शना पवार मृत्यू प्रकरण; वाचा कसा होता आठवडा

India This Week : या आठवडाभरात म्हणजे 19 जून ते 25 जून या दरम्यान, राज्यासह देशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात या घडामोडींचा सविस्तर आढावा...

India This Week :  या आठवडाभरात म्हणजे 19 जून ते 25 जून या दरम्यान, राज्यासह देशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा, शिवसेनेचा वर्धापन दिन, राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप, आंतरराष्ट्रीय योग दिन, दर्शन पवार मृत्यू प्रकरण यासह अनेक महत्वाच्या घडामोडी या आठवड्यात घडल्या आहेत. पाहुयात या घडामोडींचा सविस्तर आढावा...

19 जून 2023

Shiv Sena Foundation Day: शिवसेना वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम

Shiv Sena Foundation Day:  मागील वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena) दोन कार्यक्रम पार पडले. दसरा मेळावादेखील ठाकरे आणि शिंदे गटाने घेतला होता. त्यानंतर आता दोन्ही गटांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले. ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ष्णमुखानंद सभागृहात पार पडला, तर शिंदे गटाचा कार्यक्रम गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर जोरदार टीका केली. (वाचा सविस्तर)

MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारचा संशयास्पद मृत्यू, 

Pune Crime : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शन पवार हिचा संशयस्पद मृत्यू झालाय. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळालाय. (वाचा सविस्तर)

अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Shiv Sena Manisha Kaynde:  शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अखेर आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. (वाचा सविस्तर)

'आदिपुरुष' एक कॉन्ट्रोव्हर्सी अनेक  

'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमावर टीका होत आहे. जेव्हा रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येताना दाखवला गेला तेव्हा ट्रोलिंगला सुरुवात झाली. सिनेमातील रावण हा अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखादा मुघलकालीन क्रूर शासक असावा अशा पद्धतीने रेखाटला गेला. 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाची प्रेक्षकांना उत्सुकता होता. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरू केली. (वाचा सविस्तर)

20 जून 2023

एकनाथ शिंदेंच्या बंडाचं एक वर्ष... सेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदारांची साथ अन् थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान, काय-काय घडलं वर्षभरात?

Maharashtra Political Crisis : ज्या बंडाने संपर्ण देशात खळबळ उडवली, ज्या बंडामुळे एक सरकार कोसळलं त्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील (Shiv Sena) हे सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर रात्रीच एकनाथ शिंदे 16 आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. (वाचा सविस्तर)

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. (वाचा सविस्तर)

पंतप्रधान मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

PM Modi USA Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चार दिवसांच्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बायडन (Jill Biden) यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला रवाना होत आहेत. अमेरिकेचा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करून स्वागत केल्याबद्दल अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचे आभार मानले आहेत.
(वाचा सविस्तर)

21 जून 2023

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल! आज यूएनमध्ये करणार योग दिन साजरा

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा 24 जूनपर्यंत अमेरिका दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान बुधवारी (21 जून) न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. (वाचा सविस्तर)

International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा

International Yoga Day:  आज आंतराष्ट्रीय योग दिन आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत.  संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून  शुभेच्छा दिल्या आहेत. (वाचा सविस्तर)

22 जून 2023

अखेर शोध संपला! दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.  राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं आहे. (वाचा सविस्तर)

कोविड सेंटर कथित गैरव्यवहात प्रकरणी ईडीकडून तब्बल 13 तास छापेमारी

कोविड सेंटर कथित गैरव्यवहाराप्रकरणी (BMC Covid Scam) ईडीनं (ED) बुधवारी ठाकरे गटातील नेत्यांच्या निकटवर्तीयांसह 15 ठिकाणी छापे टाकले. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्ती मानले जाणारे पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. (वाचा सविस्तर)

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : जिल्हा परिषदांच्या (zilla-parishad) शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार आहे.  नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही.  शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (वाचा सविस्तर) 

कसोटी क्रमवारीत विराट कोहलीला फटका

ICC Test Ranking latest update : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (21 जून) कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले असले, तरी विराट कोहलीचेही फटका बसला आहे. (वाचा सविस्तर)

Asia Cup : भारतीय महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी

Women's Emerging Asia Cup : भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करत एमर्जिंग आशिया चषकावर नाव कोरले. भारतीय महिला अ संघाने फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात १२७ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल बांगलादेश महिला संघ ९६ धावांपर्यंत मजल मारु शकला. (वाचा सविस्तर)

टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन पाच अब्जाधीशांचा मृत्यू (22 जून)

टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन त्यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जगातील पाच अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. अटलांटिक महासागरात अपघातग्रस्त टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन ओशनगेट एक्स्पिडिशन्स सबमर्सिबल (Titan Oceangate Expeditions Submersible) ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतर गुरुवारी, 22 जून रोजी सकाळी अटलांटिक समुद्रात पाणबुडीचे अवशेष आढळून आले. (वाचा सविस्तर)

23 जून 2023


Patna Opposition Meeting: भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्धार, पाटण्यात एकवटले देशातील 15 विरोधी पक्षनेते, म्हणाले....

पाटणा: येत्या लोकसभेच्या निवडणुकीतल देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. (वाचा सविस्तर)

BMC तील 12 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT; मुंबई पोलीस आयुक्तांकडे SIT चं नेतृत्त्व

Mumbai Covid Scam: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) 12 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

Team India Squad West Indies Series: वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. (वाचा सविस्तर)

24 जून 2023

Maharashtra Exam: सरकारचा मोठा निर्णय! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक
Maharashtra School Exam: आता, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. (वाचा सविस्तर)

Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी खुशखबर, विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार

पंढरपूर : आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. (वाचा सविस्तर)

रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना वॅगनर सैन्याचं आव्हान

रशियामध्ये (Russia) सध्या अराजक स्थिती निर्माण झाली आहे. रशियातील खासगी सैन्य असलेल्या वॅगनर यांनी पुतीन यांनाच आव्हान दिले असून त्यांची सत्ता उलथवण्यासाठी मॉस्कोकडे (Moscow) कूच करण्यास सुरुवात केली आहे. बंडाचे निशाण फडकावल्यानंतर वॅगनर यांनी काही शहरांवर ताबा मिळवला असल्याचे दावा करण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)

Kolhapur News:अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या

Kolhapur News: अगदी अल्पावधीत औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. (वाचा सविस्तर)

Monsoon News : आनंदी आनंद गडे! मुंबईसह दिल्लीत मान्सून सक्रिय

Monsoon : मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. (वाचा सविस्तर)

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget