एक्स्प्लोर

IND vs WI India Squad: वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा OUT, तर वनडे संघात मोठे फेरबदल

Team India Squad West Indies Series: वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे आणि कसोटी संघाची जबाबदारी रोहित शर्माकडेच देण्यात आली आहे.

Team India Squad West Indies Series: वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जैस्वालला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचंही वनडे संघात पुनरागमन झालं आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचीही वनडे संघात निवड झाली आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी वनडे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार. 

12 जुलैपासून विंडीजचा दौरा

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक - 

कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)

12 ते 16 जुलै 2023 : पहिला कसोटी सामना
ठिकाण : विंडसर पार्क, डोमिनिका

20 ते 24 जुलै 2023 : दुसरा कसोटी सामना 
ठिकाण : क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद

वनडे सामने - (संध्याकाळी सात वाजता) 

27 जुलै 2023 : पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस

29 जुलै 2023 : दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस

1 ऑगस्ट 2023 - तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकॅडमी, त्रिनिदाद

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Embed widget