Weather News : उत्तर भारतात हवामानाचा मूड बदलणार, तर महाराष्ट्रासह 'या' राज्यांत पावसाची शक्यता
Weather Update : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आजचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णपणे निरभ्र होईल.
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतातील तापमानात हळूहळू वाढ नोंदवली जात आहे. तसेच अनेक भागात पाऊस पडत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आजचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. हवामान खात्य़ाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आज किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. आकाशात सूर्यप्रकाश असेल. चंदीगडचे किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. त्याच वेळी, कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील.
दिल्ली हवामान अपडेट :
याशिवाय आज मुंबईचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील. येथेही आकाश ढगाळ राहणार आहे. पाटणा, बिहारमध्ये आजचे किमान तापमान 16 अंस सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे किमान तापमान 8 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस राहील.
राजस्थान :
राजस्थानमध्ये आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जयपूरमध्ये आजचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. जयपूरमध्ये आज पाऊस पडेल. जम्मूबद्दल बोलायचे झाले तर आजचे किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे.
दररोजप्रमाणे आजही अनेक राज्यांत पाऊस पडणार आहे. skymeweather निसार, आज अंदमान आणि निकोबारमध्ये हलका पाऊस पडेल. याशिवाय महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये हलक्या पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
-
UP Election Result 2022 : गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, रायबरेली आणि अमेठीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha