Weather Update : राजस्थानसह मध्य प्रदेशात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत; आज 'या' राज्यात पावसाचा इशारा
मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली असून, काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Weather Update News: देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. तर काही राज्यामध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) राजस्थानमध्ये (Rajasthan) सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली असून, काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आजही काही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या राज्यात जोरदार पावसाचा इशारा
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसानंतर तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. पावसाचे पाणी घरात आणि दुकानात शिरल्याने नागरिकांची अडचण झाली आहे. मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. काही भागात वाहनेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आजही मध्य राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज (17 सप्टेंबर) राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये हवामान बदल झाला आहे. अधूनमधून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तापमानात देखील घट झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 ते 21 सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय उत्तराखंडमध्येही 20 सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा रेड अलर्ट
उत्तर प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (17 सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्येही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजस्थानच्या उदयपूर आणि कोटा विभागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: