वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेणार : पंतप्रधान
इंजिनीअरिंग आणि मेडिकलचे अभ्यासक्रमही मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधल्या प्रचारसभेत केली.
सासाराम (बिहार) : वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवण्याचा निर्णय घेणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पहिल्या प्रचारसभेत केली. तसंच बिहारमध्ये एनडीएचंच सरकार येणार अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या प्रचाराला सुरुवात केली. सासाराममध्ये त्यांची पहिली सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारही सभेत उपस्थित होते. मोदींनी भोजपुरीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी दिवंगत रामविलास पासवान यांना श्रद्धांजलीही वाहिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "देशाच्या शिक्षणव्यवस्थेत बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून प्रेरणा घेऊन आता वैद्यकीय, अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमही मातृभाषेत शिकवण्याचा प्रयत्न असेल.
जेईई मेन परीक्षेत प्रादेशिक भाषांमध्ये वाढ : केंद्रीय शिक्षणमंत्री दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते. या प्रादेशिक भाषांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यासंदर्भात ट्वीट करुन ही माहिती दिली. यापूर्वी ही परीक्षा इंग्लिश, हिंदी आणि गुजराती या तीनच भाषांमध्ये घेण्यात येत होती.
देशातील 22 प्रादेशक भाषांना प्रोत्साहन देण्याचं आमचं धोरणं आहे. कोणीही भाषा लादायचा किंवा इंग्लिश भाषा नको असाही उद्देश नाही. परंतु भाषा निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवं आणि शिक्षणात भाषा ही अडथळा ठरु नये असा यामागील उद्देश असल्याचं पोखरियाल यांनी सांगितलं.
This decision has far-reaching implications as Hon'ble PM Shri @narendramodi ji has pointed out that top-scoring countries in PISA examination use mother tongue as a medium of instruction. The decision of JAB will help students comprehend questions better & score higher. @DG_NTA
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) October 22, 2020