एक्स्प्लोर
मध्य प्रदेश, मिझोरम विधानसभेसाठी मतदान सुरु
मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी आणि मिझोरमच्या 40 जागांसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
भोपाळ/ऐजावल : मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी आणि मिझोरमच्या 40 जागांसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या भाजपची सत्ता आहे तर, मिझोरममध्ये काँग्रेस सत्ताधारी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आज सत्ता टिकवण्यासाठी कांटे की टक्कर आहे. दोन्ही राज्यांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज एकाच वेळी मध्य प्रदेशमध्ये सर्व 230 जागांसाठी मतदान होत आहे. गेली 15 वर्षे मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आहे. तर दुसऱ्या बाजूला मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मिझोरममध्ये काँग्रेस आणि मिझोराम नॅशनल पार्टी या दोन पक्षांच्या युतीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात सत्तापालट करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे तर, मिझोराममधील सत्ता टिकवण्याचं आव्हानही काँग्रेससमोर आहे.
वाचा : Chhattisgarh Election 2018 : दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement