एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या BSF जवानाबाबत वीरेंद्र सेहवाग म्हणतो...
नवी दिल्ली: बीएसएफ जवान तेजबहादूर यादवनं फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानं मोठी खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने बड्या अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्याचा हा व्हिडिओ 70 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून 4 लाख जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, तेजबहादूरच्या व्हिडिओनंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या सैनिकांना आणि शेतकऱ्यांची देखभाल करणं गरजेचं आहे. खाण्याची योग्य व्यवस्था झाली पाहिजे.' असं म्हणत सेहवागनं ट्विटमध्ये #Food4Soldiers असा हॅशटॅग केला आहे.
सेहवागच्या आधी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील तेजबहादूरची पाठराखण केली आहे. शत्रुघ्न सिन्हानं ट्विटं केलं आहे. 'सैनिकांची अवस्था पाहून मी खूपच दु:खी आहे. या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हायला हवी.Whatever said and done,our Soldiers and Farmers need to be taken better care of. Proper food needs to reach them all.#Food4Soldiers pic.twitter.com/5WG9btYabs
— Virender Sehwag (@virendersehwag) January 10, 2017
Am deeply concerned on seeing the plight of Indian military and paramilitary forces as shown through the eyes of a paramilitary soldier... — Shatrughan Sinha (@ShatruganSinha) January 9, 2017दरम्यान, बीएसएफनं एक पत्रक जारी करुन म्हटलं आहे की, 'जवानांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम तत्पर असतो. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका उच्च अधिकाऱ्याला तिथं पाठविण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement