![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
विकास दुबे चकमक खोटी नाही, युपी सरकारकडून पोलिसांचा बचाव
मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वात ही सुनावणी होईल.घनश्याम उपाध्याय आणि अनूप प्रकाश अवस्थी या दोन वकिलांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर न्यायालय सुनावणी सुरु होती.
![विकास दुबे चकमक खोटी नाही, युपी सरकारकडून पोलिसांचा बचाव Vikas Dubey encounter UP government files affidavit defending police विकास दुबे चकमक खोटी नाही, युपी सरकारकडून पोलिसांचा बचाव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/25233546/Supreme-Court.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांची चकमक खोटी नसल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. पोलिस चकमकीत गुंड विकास दुबे आणि त्याच्या पाच साथीदारांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठामार्फत सुनावणी होईल.
मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वात ही सुनावणी होईल.घनश्याम उपाध्याय आणि अनूप प्रकाश अवस्थी या दोन वकिलांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर न्यायालय सुनावणी सुरु होती.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांच्या चकमकीची सीबीआयच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणार्या याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान, दुबे आणि साथीदारांच्या चकमकी संदर्भात रिपोर्ट दाखल करणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने कोर्टाला सांगितले.
सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांचे खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करत होते. चकमकीत विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांच्या हत्येची आणि आठ पोलिस कर्मचार्यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पॅनेल गठित करण्यावर विचार करता येईल, असे कोर्टाने म्हटले होते. त्याचबरोबर कोर्टाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी 20 जुलैची तारीख निश्चित केली.
विकास दुबेला अटक केल्यापासून ते मृत्यूपर्यंत गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
गुरुवारी, 9 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास विकास दुबे याला उज्जैन येथील महाकाळ मंदिरात आत्मसमर्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार, विकासने मंदिराच्या रक्षकांना आपले नाव सांगितले, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. यानंतर उज्जैन पोलिसांनी सुमारे 8 तास त्याची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांचे मृतदेह जाळण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. दरम्यान, कानपूरमध्ये यूपी पोलिसांनी विकास दुबेची पत्नी ऋचा आणि तिच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी ऋचाला विचारपूस केली. उज्जैनमध्ये विकास दुबेच्या प्रकरणाची नोंद न असल्याने आणि कानपूर एसएसपीच्या विनंतीवरून त्याला संध्याकाळीच तिथे पोहोचलेल्या यूपी पोलिसांच्या एसटीएफच्या पथकाकडे सोपविण्यात आले. यानंतर एसटीएफची टीम मोठा ताफा घेऊन उज्जैन ते कानपूरकडे रस्ता मार्गे रवाना झाली. मध्यप्रदेशच्या भोपाल, गुना, झाशी आणि त्यानंतर उत्तरप्रदेश मधील रस्त्यांवर मोठा फौजफाटा होता. ज्या गाडीत विकास दुबे होता त्या गाडीच्या 10-12 किमीच्या अंतरावर कोणत्याही वाहनाला येण्याची परवानगी नव्हती. जवळपास 50 पेक्षा अधिक पोलिस विकास दुबेसोबत होते. एमपी ते यूपी या पूर्ण रस्त्यावर शेकडो पोलिस उपस्थित होते. शुक्रवारी, 10 जुलै रोजी पहाटे साडेसहा वाजता विकास दुबे यांना घेऊन जाणारी एसटीएफची टीम कानपूर हद्दीत आली. संध्याकाळी 6.25 च्या सुमारास विकास दुबेला घेऊन जाणारे एसटीएफचे वाहन रस्त्यावर पटली झाले. यादरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, सोबत पोलिसांची बंदूक ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी त्याची चकमक झाली. त्यात तो मारला गेला. या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथं सकाळी 7.45 च्या सुमारास विकास दुबेला मृत घोषित करण्यात आलं.
संबंधित बातम्या :
विकास दुबेची अटक ते एन्काऊटर... गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)