एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी, रविवारी शपथविधी
अहमदाबाद: आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रविवारी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. खरं तर दिवसभर मुख्यमंत्रिपदासाठी नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ऐनवळी भाजपनं धक्का देत विजय रुपानी यांच्या नावाला पसंती दिली. येत्या वर्षभरात गुजरातमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे रुपानी भाजपला यश मिळवून देणार का प्रश्न आहे.
वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता. गुजरातमधील पटेल समाजाचं आरक्षणासाठी झालेलं आंदोलन, उनामधील दलितांवरील अत्याचाराचं प्रकरण, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यामुळे आनंदीबेन पटेल यांच्या सरकारवर टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांना पायउतार व्हाव लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement