एक्स्प्लोर
VIDEO : गुजरातमधल्या अमरेली गावात सिंहिणीचा मुक्काम

अमरेली : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातल्या वीरपूरमध्ये रविवारी दिवसाढवळ्या सिंहिणीचं दर्शन घडलं. गीर जंगलाला लागून असलेल्या या गावात वाघ, सिंह येणं तसं नित्याचं आहे. पण यावेळी सिंहिणीनं चक्क गावातच मुक्काम ठोकला.
गल्ल्यांमध्ये फेरफटका मारुन सिंहिणीनं गायीची शिकार केली. त्यानंतर गावकऱ्यांसमोरच गायीचा फडशा पाडायला सुरुवात केली. पण गर्दी वाढू लागल्यानं तिने शिकार सोडून जंगलात धूम ठोकली.
त्यानंतर सायंकाळी अंधार पडताच सिंहीण पुन्हा गावात परतली. अर्धवट सोडलेल्या गायीचा पुन्हा फडशा पाडायला सुरुवात केली. अखेर गावकऱ्यांनी वनविभागाला बोलवत सिंहिणीला जंगलात पळवून लावलं.
पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
















