Uttar Pradesh Election 2022 Date: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात होणार मतदान
UP Election 2022 Dates: निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशातील निवडणुका जाहीर केल्या आहे. यूपीमध्ये 403 जागांसाठी सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे.
UP Assembly Election 2022 Date Schedule : उत्तर प्रदेशमधील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उत्तरप्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उत्तरप्रदेशात पहिला टप्पा 10 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार, 3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे. निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे.
निवडणुका जाहीर केल्यानंतर उत्तरप्रेदशात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यान कोरोनासंबंधित नियमांचे देखील पालन करयाचे आहे. यामध्ये सर्व पदयात्रा, सभांवर बंदी घालण्यात आलेली आहे. निवडणुक काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
उत्तरप्रदेशात सध्या भाजपचे सरकार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेचा कार्यकाळ 14 मे ला समाप्त होणार आहे. दरम्यान 14 मे पूर्वी यूपी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणाप आहे. यूपीमध्ये 403 जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. या अगोदर यूपीमध्ये विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 साली झाल्या होता. 2017 साली भाजपच्या नेतृत्त्वाखाली एनडीएने 325 जागांवर यश मिळवले होते. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी 19 फेब्रुवारी 2017 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहे ज्यांनी यूपीमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
उत्तरप्रदेशातील 2017 चा निकाल
- भाजप - 325
- एसपी - 47
- बीएसपी - 19
- कॉंग्रेस - 07
- इतर - 05
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता