Uttar Pradesh Elections : काँग्रेसने उत्तर प्रदेशसाठी 30 स्टार प्रचारकाची यादी केली जाहीर
UP Election 2022 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
UP Election 2022 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, सपा, बसपा आणि इतर पक्षांनी आपला प्रचार सुरु केला आहे. कोरोना नियमांचं पालन करत सध्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमधील आपल्या स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सोनिया गांधी, मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांच्यासह 30 जणांचा सहभाग आहे.
काँग्रेसने सोमवारी ट्वीट करत उत्तर प्रदेशमधील 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आजाद, अशोक गेहलोत, भुपेश बघेल, सचिन पायलट आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.
Congress releases a list of 30 star campaigners for the first phase of #UttarPradeshElections
— ANI (@ANI) January 24, 2022
Party chief Sonia Gandhi, ex-PM Dr Manmohan Singh, party leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Ghulam Nabi Azad, Ashok Gehlot, Bhupesh Baghel, Sachin Pilot & others to campaign. pic.twitter.com/dyk02cq4Ca
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात होतेय मतदान
पहिला टप्पा - 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा - 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा - 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा - 27 फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा - 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा - सात मार्च 2022 रोजी मतदान
महत्वाच्या बातम्या वाचा -
UP Election : प्रियांका गांधी काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जाणून घ्या काय म्हणाल्या प्रियांका गांधी
UP Election 2022 : उत्तर प्रदेशात भाजपकडून आतापर्यंत 194 उमेदवारांची यादी जाहीर; कोणाकोणाला उमेदवारी?
Covid19 : तिसर्या लाटेचा धोका! पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, जाणून घ्या तेथील कोरोनाची स्थिती...
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live