Covid19 : तिसर्या लाटेचा धोका! पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, जाणून घ्या तेथील कोरोनाची स्थिती...
Assembly Election 2022 : 23 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,699 नवीन रुग्ण आढळले आहेत.
Assembly Election 2022 : एकीकडे पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असतानाच, कोरोना संसर्ग आणि ओमायक्रॉन प्रकारामुळे देश वेगाने तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत आहे. कोरोना संक्रमणाच्या छायेत देशात 14 फेब्रुवारीपासून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, वाढत्या कोरोनारुग्णांची संख्या पाहता निवडणूक आयोगाने या राज्यांमध्ये निवडणूक रॅलींवर नुकतीच बंदी घातली आहे. या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती कशी आहे ते जाणून घेऊया.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 13,830 नवे कोरोनाबाधित तर, 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये 5,664 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, उत्तराखंडमध्ये 3,727 नवे रुग्ण आणि 5 जणांचा आणि गोव्यात 1,582 नवे कोरोनाबाधित आणि आठ जणांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासाठी 24 तासांत एकूण 2,32,051 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी, राज्यात 24 तासांत 16,521 लोक बरे झाले असून, आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18,30,006 झाली आहे. यासोबतच 19 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, या विषाणूमुळे आतापर्यंत एकूण 13,83,020 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंजाब
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,699 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी या साथीच्या आजारामुळे आणखी 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची 7,07,847 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर एकूण 5,66,430 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
उत्तराखंड
राज्य सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, मागील 24 तासात उत्तराखंडमध्ये 3,727 लोक कोरोना संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 1270 संक्रमित बरे झाले आहेत. अहवालानुसार, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही 31 हजारांच्या पुढे गेली आहे. तर, एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,00,401 वर पोहोचली आहे.
गोवा
गोव्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,691 रुग्ण आढळले आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यातील एकूण मृतांची संख्या 3,602 वर पोहोचली आहे. त्याचवेळी, आरोग्य अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 3274 लोक बरे झाले आहेत.
देशात 3 लाख 33 हजार 533 नवे रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 3 लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण आढळले असून 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 17.78 टक्के आहे. मोठी गोष्ट म्हणजे देशात कालच्या तुलनेत 4 हजार 171 कमी रुग्ण आढळले आहेत, काल कोरोना विषाणूचे 3 लाख 37 हजार 704 रुग्ण होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित
- आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट, राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद; वाचा सविस्तर
- Cold Weather : मुंबईत कालची रात्र सर्वाधिक थंडीची, तापमान 16 अंशांवर; राज्यात 3 ते 4 दिवस गारठा कायम राहणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha