एक्स्प्लोर
यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
हा निकाल आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मुख्य (मेन्स) परीक्षेसाठी नव्याने विस्तृत अर्ज (डीएएफ) करावा, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 3 जून रोजी झालेल्या नागरी सेवा (CSE) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मुख्य (मेन्स) परीक्षेसाठी नव्याने विस्तृत अर्ज (डीएएफ) करावा, असं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.
डीएएफ भरण्यापूर्वी उमेदवाराला यूपीएससीच्या वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
जवळपास आठ लाख उमेदवारांनी पूर्व परीक्षा दिली होती. त्यापैकी दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षेचा कट ऑफ मे 2019 मध्ये अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पाहता येईल.
मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकासोबतच ई-प्रवेश पत्र (हॉलतिकीट) यूपीएससीच्या वेबसाईटवर परीक्षा सुरु होण्यापूर्वी तीन आठवडे अगोदर अपलोड केलं जाईल, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
निकाल कसा पाहाल?
निकाल पाहण्यासाठी यूपीएससीच्या upsc.gov.in या वेबसाईटवर जा
वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवरच निकालाची लिंक देण्यात आली आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर निकालाच्या पीडीएफची लिंक देण्यात आली आहे.
पीडीएफच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची यादी ओपन होईल. यामध्ये तुमचा क्रमांक शोधा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement