Uttar Pradesh : नोकरीची मागणी करणाऱ्या भावी शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार
Lathi charge on Protesting Student : शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या बेरोजगारांवर लखनऊ पोलिसांनी लाठीमार केला. या मुद्यावरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

Lathi-charge on Protesting Student Teachers: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या बेरोजगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. शनिवारी, रात्री बेरोजगार विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव करण्यासाठी लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आत या मुद्यावरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
लखनऊमध्ये शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या जवळपास एक हजार बेरोजगार तरुणांकडून मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले होते. त्याचवेळी पोलीस दाखल झाले. त्यांनी या बेरोजगारांना अटकाव केला. मात्र, त्यानंतरही मेणबत्ती मोर्चावर ठाम असणाऱ्या युवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या बेरोजगारांकडून राज्यात 69 हजार शिक्षकांना पुन्हा सेवेत घ्यावे. त्याशिवाय आणखी 22 हजार जागांवर शिक्षक भरती करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
पोलिसांच्या या कारवाईवर विरोधकांनी सरकार टीका केली आहे. भाजपच्या सत्ताकाळात भावी शिक्षकांवर लाठीमार करून 'विश्वगुरू' होण्याचा मार्ग प्रशस्त केला जात असल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली.
भाजपा के राज में भावी शिक्षकों पर लाठीचार्ज करके ‘विश्व गुरु’ बनने का मार्ग प्रशस्त किया जा रहा है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 4, 2021
हम 69000 शिक्षक भर्ती की माँगों के साथ हैं।
युवा कहे आज का ~ नहीं चाहिए भाजपा#भाजपा_ख़त्म pic.twitter.com/Ns1FpknRG7
उत्तर प्रदेशमध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पक्षानेही पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. सरकारने बेरोजगार तरुणांवर लाठीमार करताना एक गोष्टी लक्षात घ्यावी की तरुणांनी भाजपला सत्तेत बसवले. आता त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा तुमच्या सत्तेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकणार असल्याची टीका खासदार संजय सिंग यांनी केली.
आदित्यनाथ जी जितना मन चाहे इन बेरोज़गार नौजवानों को पिटवा लीजिये लेकिन दो बात याद रखियेगा।
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) December 4, 2021
1.इन्ही नौजवानों ने आपको सत्ता के शिखर तक पहुँचाया।
2.बेरोज़गारों पर हो रहे जुर्म आपकी सत्ता के ताबूत में आख़िरी कील साबित होगी। pic.twitter.com/VTXX8iyXtY
बसपा नेते सतिशचंद्र मिश्रा यांनीदेखील भाजप सरकारवर टीका केली आहे. गोष्ट नोकरीची झाली होती. मात्र, त्यांच्यावर लाठीमार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे विरोधकांना भाजप सरकारवर टीका करण्यासाठी एक संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
