एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सूर्य नमस्कार आणि नमाजमध्ये साम्य: योगी आदित्यनाथ
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजमध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे. सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांची नमाज पढण्याची प्रक्रिया मिळती-जुळती असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लखनौमध्ये तीन दिवसीय योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, '2014 पूर्वी योग हे सांप्रदायिक असल्याचं मानलं जात होतं. पण आता जगभरातील लोकांना याचं महत्व पटलं आहे.' आदित्यनाथ यांनी योगातील सर्वात महत्वाच्या सूर्य नमस्काराची तुलना नमाजशी केली. 'सूर्य नमस्कार काही प्रमाणात नमाजशी मिळतंजुळतं आहे. त्यामुळे याला सांप्रदायिक नजरेनं पाहू नका.'
'योग ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा फायदा होऊ शकतो.' असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या कार्याचंही कौतुक केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement