एक्स्प्लोर

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : ट्रक-कारच्या अपघातात पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी, मावशी, काकूंचा मृत्यू

या अपघातात ज्या ट्रकने कारला धडक दिली आहे त्या ट्रकच्या नंबर प्लेटशी छेडछाड करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक जप्त करून ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहेत. ते सध्या तुरुंगात आहेत. या बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.

रायबरेली: भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असणाऱ्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणी अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात पीडित तरूणीच्या आई आणि काकूंसह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवती तिची आई, नातेवाईक आणि वकिलांसह जात कारने जात होती. यावेळी रायबरेलीमध्ये ट्रक आणि कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला. यामध्ये पीडित मुलीची मावशी आणि काकूंसह अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पीडित युवती आणि वकील महेंद्र सिंह गंभीर जखमी झाले आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा यापूर्वीच संशयित मृत्यू झाला आहे. या अपघातात ज्या ट्रकने कारला धडक दिली आहे त्या ट्रकच्या नंबर प्लेटशी छेडछाड करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रक जप्त करून ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहेत. ते सध्या तुरुंगात आहेत. या बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. या अपघातानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली असून त्यांनी ही हत्येचा कट असू शकतो, याची सीबीआय चौकशी व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेशमध्ये जंगल राज सुरु असून आरोप निर्धास्त आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पीडित तरूणीच्या बहिणीने देखील या अपघातमागे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या माणसांचा हात असल्याचा आरोप केला आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : ट्रक-कारच्या अपघातात पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी, मावशी, काकूंचा मृत्यू काय आहे प्रकरण? गेल्या वर्षी जून महिन्यात सेंगरची महिला सहकारी शशि सिंह पीडितेला नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे घेऊन गेली होती. यावेळी कुलदीप सेंगर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी न्याय मागण्यासाठी पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गेले. पण भेट मिळू न शकल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी तिच्यासह कुटुंबियांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांच्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगर विरोधात गुन्हा दाखल केला, पण त्याला अटक केली नव्हती. पण विरोधक, जनतेचा रोष, मीडियाचा दबाव यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. एसआयटीच्या अहवालानंतर योगी सरकारने आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच या घटनेचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात सीबीआयने आरोपी आमदाराला अटक केली नसल्याने अलाहाबाद हायकोर्टानेही फटकारले होते. यानंतर आरोपी सेंगरला लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात आली. यानंतर कुलदीप सेंगरवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे. तर सेंगरची सहकारी महिला शशि सिंह हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित बातम्या

VIDEO | भाजप खासदार साक्षी महाराज बलात्कारी आरोपीच्या भेटीला, तब्बल दोन तास चर्चा 

ब्लॉग : बलात्काऱ्यांना फाशीच हवी ; पण...

बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, कुलदीप सिंह सेंगरचा दावा

उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक

उन्नाव प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नाही : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेश : उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजप आमदारावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget