DRDO ची कमाल; येत्या तीन महिन्यांत देशात 500 वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करणार
डीआरडीओने 380 वैद्यकीय ऑक्सिजन केंद्रांची उभारणी करण्याचे काम सुरुही केले आहे. तसेच टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि ट्रायडन्ट न्यूमेटिक प्रायव्हेट लिमिटेडला 332 केंद्र विकसित करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
![DRDO ची कमाल; येत्या तीन महिन्यांत देशात 500 वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करणार Under PM Care Fund, DRDO will start 500 medical oxygen production plants in the country in next three months DRDO ची कमाल; येत्या तीन महिन्यांत देशात 500 वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/28/cbba162812d871e2f84ac16b5a051502_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, पीएम केअर्स फंड अंतर्गत, कोविड-19 रुग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजननिर्मिती करणारे प्लांट उभारणार आहे. भारताची हलक्या वजनाची लढाऊ जहाजे तेजससाठी विमानात नेता येईल असा ऑक्सिजन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान डीआरडीओच्या DEBEL या विभागाने विकसित केले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर या प्लांटसाठीही केला जाणार आहे. या प्लांटमध्ये प्रति मिनिट 1000 लिटर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. या व्यवस्थेमुळे, पाच लिटर प्रती मिनिट या वेगाने 190 रूग्णांना दिवसभर ऑक्सिजन पुरवला जाऊ शकतो. तसेच, 195 सिलेंडर देखील भरले जाऊ शकतात.
या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण बंगळूरूच्या मेसर्स टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि कोयंबतूरच्या मेसर्स ट्रायडन्ट न्यूमेटिक प्रायव्हेट लिमिटेडला करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या देशभरातल्या विविध रुग्णालयांमध्ये 380 ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणार आहेत. या व्यतिरिक्त 500 LPM क्षमतेचे 120 प्लांट्स सीएसआयआरच्या अखत्यारितील भारतीय पेट्रोलियम संस्था तयार करणार आहे.
आरोग्य सुविधा केंद्रात तसेच कोविड रुग्णालयांमध्ये सध्या वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता अत्यंत महत्वाची ठरते आहेत. या वैद्यकीय ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक अशा या तंत्रज्ञानानुसार, 93.3% ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता असून तो थेट रूग्णालयातील रुग्णांना दिला जाऊ शकतो किंवा ऑक्सिजन सिलेंडर्समध्ये भरला जाऊ शकतो. यासाठी बदलत्या दाबाशी समतोल राखणारे PSA तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. तसेच वातावरणातल ऑक्सिजन थेट कढून घेणाऱ्या मोल्यूक्युलर सीव्ह तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान या महामारीच्या काळात, शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांपर्यंत थेट ऑक्सिजन पुरवठा करण्यास उपयुक्त ठरणार आहे. यातून रुग्णालयांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन गरजेच्या वेळी मिळू शकेल.
या सर्व प्लांटची उभारणी झाल्यानंतर, रूग्णांलयांमध्येच ऑक्सिजन पुरवण्यासाठीची व्यवस्था असेल आणि दुर्गम तसेच ग्रामीण भागात त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. लष्कराच्या इशान्य आणि लेह -लदाख भागात, लष्कराने अशाप्रकारचे ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. हे प्लांट ISO 1008 नुसार आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणारे आहे. दिल्ली आणि एनसीआर प्रदेशातील पाच प्रस्तावित प्लांटची उभारण्याची तयारी सुरु झाली आहे.
डीआरडीओने 380 वैद्यकीय ऑक्सिजन केंद्रांची उभारणी करण्याचे काम सुरुही केले आहे. तसेच टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि ट्रायडन्ट न्यूमेटिक प्रायव्हेट लिमिटेडला 332 केंद्र विकसित करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. कोयंबतूर येथील कंपनी पीएमकेअर्स फंडमधून दर महिन्याला 125 प्लांट्स तयार करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)