Uddhav Thackeray-Eknath Shinde : सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? सुप्रीम कोर्ट देणार उद्या निकाल
Maharashtra political crisis : प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का?
Maharashtra political crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात सलग तीन दिवस सुनावणी सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) सुप्रीम कोर्ट निकाल सुनावणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला. दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याचा निर्णय सुप्रीम कोर्ट उद्या घेणार आहे.
शिंदे-उद्धव विवाद के एक अहम पहलू को सुनवाई के लिए 7 जजों की बेंच को भेजने पर SC कल आदेश देगा। उद्धव कैंप ने 2016 के 'नबाम रेबिया' फैसले को गलत बताते हुए यह मांग की है। इसमें कहा गया था कि अगर स्पीकर को पद से हटाने का प्रस्ताव लंबित है, तो वह MLA की अयोग्यता पर विचार नहीं कर सकते।
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) February 16, 2023
#BREAKING Supreme Court to pronounce order tomorrow on reference in Shiv Sena rift case.
— Live Law (@LiveLawIndia) February 16, 2023
A 5-judge bench had reserved judgment today on whether to refer "Nabam Rebia" decision to larger bench.#SupremeCourt pic.twitter.com/cfYBZAGGn8
..तर सत्तासंघर्षाचा पेच २०२४पर्यंत लांबणार?
- सात न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन होणार का? याबाबत अस्पष्टता
- सात न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन करण्यासाठी वेळ लागू शकतो
- घटनापीठ स्थापन झाल्यानंतर पुन्हा प्रकरणावर नव्यानं सुनावणी होईल
- दोन्ही बाजूंनी वेगवेगळा युक्तिवाद केला जाईल
- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला पुन्हा प्रतिवादाची शक्यता
- प्रतिवाद झाल्यानंतर सात न्यायमूर्तींचं घटनापीठ निकाल देऊ शकतं
आणखी वाचा :
Maharashtra Hearing : सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय घडलं? कोर्टाबाहेरुन 'माझा'चा रिपोर्ट
Shivsena: पक्षांतर बंदीमध्ये बहुमत- अल्पमत असा मुद्दा नाही; कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानी यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे