एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवनेरीवरील माती कलशात घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
अयोध्येत उद्धव ठाकरेंची सभा होणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र सभेसाठी परवानगीच मागितली नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. अयोध्येला रवाना होण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर जाऊन तिथली माती कलशात भरुन अयोध्येला नेणार आहेत.
शिवसेनेचे दिग्गज नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. हा सोहळा जिथे होणार आहे, त्या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी पूजा केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत यासारखे नेते यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या एक गटानेही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.
अयोध्येत उद्धव ठाकरेंची सभा होणार नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र सभेसाठी परवानगीच मागितली नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर सभेबद्दल दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचं आमंत्रण केवळ धुडकावलंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. "आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत," असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केलं.
"या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना केवळ प्रचार करण्यासाठी आणि राजकारणासाठी अयोध्यात कार्यक्रम करत आहेत," असा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला आहे. "जर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वादी पक्षांचा मंदिर बनवणं हाच हेतू असेल, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन का?" असा प्रश्नही महंत नरेंद्र गिरी यांनी विचारला आहे. "शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांमुळे मंदिर बांधण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघणार नाही," असं महंद नरेंद्र गिरी म्हणाले.
महंत नरेंद्र गिरी यांच्या माहितीनुसार, "शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेऊन आखाडा परिषद 4 आणि 5 डिसेंबर रोजी अयोध्येत वेगळी बैठक घेणार आहे. या बैठकीत अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांसह अनके मुस्लीम धर्मगुरुंना आमंत्रण देण्यात आलं आहे. जर राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर परस्पर सहमतीने काहीतरी तोडगा नक्कीच निघेल."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement