एक्स्प्लोर

UAN-Aadhaar Linking: आधारकार्ड पीएफ खात्याशी लवकर लिंक करा; EPFO ने मुदत वाढवली

असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांना जीवन विमा, आरोग्य विमा लाभ आणि भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी त्यांची ओळख किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आणि अवलंबितांची ओळख आधारद्वारे तपासून घ्यावी लागेल.

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO ने इलेक्ट्रॉनिक चालान व रिटर्न (ECR) सादर करण्यासाठी आधार क्रमांक युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (UAN) जोडण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने एका परिपत्रकात असे म्हटले होते की ज्या सदस्यांचा आधार क्रमांक UAN शी जोडला जाईल अशा सभासदांना 1 जूनपासून ECR जमा करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने 15 जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकात आपल्या सर्व क्षेत्र कार्यालयांना 1 सप्टेंबरपासून हे नियम पाळण्यास आपल्या कर्मचाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे.

UAN बरोबर आधार क्रमांक जोडणे बंधनकारक का आहे?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने  सोशल सिक्युरिटी कोड सेक्शन 142 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या सेक्शनमध्ये असं म्हटलं आहे की असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांना जीवन विमा, आरोग्य विमा लाभ आणि भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी त्यांची ओळख किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आणि अवलंबितांची ओळख आधारद्वारे तपासून घ्यावी लागेल.

या नियमांचा काय परिणाम होईल?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने नियोक्तांना (Employers) निर्देश दिली आहे की जर पीएफ खाते (PF Account) आधारशी जोडले गेले नाही किंवा UAN आधारद्वारे वेरिफाय झाले नाही तर त्या खात्याचा ईसीआर जमा होणार नाही. याचा अर्थ असा की कर्मचार्‍यांना त्यांच्या पीएफ खात्यात त्यांचा हिस्सा मिळेल आणि त्यांच्या मालकांचा हिस्सा मिळू शकणार नाही.

यासह, हे देखील सांगण्यात आले आहे की जर हा नियम पाळला गेला नाही तर EPF खातेदार EPFO द्वारे प्रदान केलेल्या सेवा वापरण्यास सक्षम राहणार नाहीत. EPFO चे जवळजवळ 6 कोटी अॅक्टिव्ह सबस्क्राबर्स असून सुमारे 14 लाख कोटी रुपयांची उलाढाल होते.

EPF अकाऊंट आधारशी लिंक कसं करणार?

  • EPFO वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
  • UAN आणि पासवर्ड वापरुन आपलं अकाऊंट लॉगिन करा.
  • "Manage" सेक्शनमध्ये KYC पर्यायावर क्लिक करा.
  • जो होमपेज ओपन होईल तिथे आपल्या EPF अकाऊंटसह जोडण्यासाठी आपल्याला अनेक कागदपत्र पाहू शकाल.
  • आधार पर्याय निवडा आणि आधार कार्डवर आपला आधार नंबर आणि आपले नाव टाइप करून Sarvice वर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेली माहिती सेव होईल. आपलं आधारकार्ड UIDAI च्या डेटासह वेरिफाय केले जाईल.
  • एकदा KYC ची कागदपत्रे योग्य झाली की, तुमचं आधारकार्ड तुमच्या EPF खात्याशी जोडलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधारच्या माहितीसमोर “Verify” लिहिलेलं दिसेल.

EPF खात्याशी आधार लिंक करण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया

  • EPF खात्याशी आधार लिंक ऑफलाइन केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला EPFO कार्यालयात जावे लागेल.
  • EPFO कार्यालयात जाऊन “Adhaar Seeding Application” फॉर्म भरा.
  • सर्व तपशीलांसह फॉर्ममध्ये आपले UAN आणि Adhaar प्रविष्ट करा.
  • फॉर्मसह आपल्या UAN, PAN आणि आधारची सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडा.
  • EPFO किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आउटलेटच्या कोणत्याही फील्ड ऑफिसमध्ये एक्जिक्युटिव्हकडे ते सबमिट करा.
  • योग्य पडताळणीनंतर, तुमचा आधार तुमच्या EPF खात्याशी लिंक केला जाईल.
  • आपल्‍याला ही माहिती आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येणार्‍या मेसेजद्वारे मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget