Businessman Subrata Roy Last Rites : 'सहारा' सम्राटांच्या 'बेसहारा' आयुष्याची शोकांतिका; पोटची दोन मुलं अंत्यसंस्काराला सुद्धा आली नाहीत
Subrata Roy : कधीकाळी देशातील गर्भश्रीमंतांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणाऱ्या सुब्रत रॉय यांना आपल्या दोन मुलांना खांदा सुद्धा देऊ नये, हीच त्यांच्या बेसहारा आयुष्याची शोकांतिका झाली आहे.
Businessman Subrata Roy Last Rites: सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्यावर गुरुवारी (16 नोव्हेंबर) उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नातू हिमांक रॉयने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सुब्रत रॉय यांची दोन मुले सुशांतो आणि सीमांतो रॉय अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नाहीत याचं कारण समोर आलं आहे. कधीकाळी देशातील गर्भश्रीमंतांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावणाऱ्या सुब्रत रॉय यांना आपल्या दोन मुलांना खांदा सुद्धा देऊ नये, हीच त्यांच्या बेसहारा आयुष्याची शोकांतिका झाली आहे.
न्यूज 24 च्या वृत्तानुसार, सुब्रत रॉय यांच्या पत्नी स्वप्ना रॉय यांना त्यांचे मुलगे न येण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ते परदेशात आहेत आणि काही कारणांमुळे ते प्रवास करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी लंडनहून त्यांचा नातू हिमांकला बोलावले. सुब्रत रॉय यांच्या पार्थिवाला मुखाग्नि देण्यात आला. हिमांक हा सुब्रत रॉय यांचा धाकटा मुलगा सीमांतोचा मोठा मुलगा असून तो लंडनमध्ये शिकतो.
Funeral procession of Subrata Roy Sahara being taken out from Sahara City, Lucknow to Baikunth Dham cremation ghat for final rites. pic.twitter.com/E4BIRwsUKq
— Piyush Rai (@Benarasiyaa) November 16, 2023
अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक नामवंत हजर
सुब्रत रॉय यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक नामवंत हजर होते. सुब्रत रॉय यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही आले होते. सुब्रत रॉय यांचे मंगळवारी (14 नोव्हेंबर) रात्री निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. रॉय यांची तब्येत बिघडल्याने 12 नोव्हेंबर रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे कंपनीने एक निवेदन जारी केले होते.
निवेदनानुसार, मेटास्टेसेस, उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे झालेल्या गुंतागुंतांशी लढत असताना रॉय यांचे 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10:30 वाजता कार्डिओरेस्पीरेटरी अरेस्टमुळे निधन झाले.
सुब्रत रॉय यांच्या कुटुंबात आता कोण आहे?
सुब्रत रॉय यांच्या पश्चात पत्नी स्वप्ना रॉय आणि दोन मुले सुशांतो रॉय आणि सीमांत रॉय असा परिवार आहे. त्यांची मुलेही सहारा समूहाशी संबंधित आहेत. रॉय हयात असताना त्यांनी आपला उत्तराधिकारी घोषित केला नाही. त्यांची मुले वडिलांचा व्यवसाय सांभाळतील असे मानले जाते. सुब्रत रॉय यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेकांना उदारपणे मदत केली होती. पण आज काही मोजके सोडले तर त्याच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही. गीतेतही, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला शिकवले की एखाद्याच्या कर्मांवर अधिकार आहे पण कर्मांच्या फळावर कधीच नाही. पण सुब्रत रॉय यांच्या कृत्याचे परिणाम त्यांच्यावर खूप झाले.
सहारा समूह सेबीच्या वादात इतका अडकला की कंपनीचे सर्व काही उद्ध्वस्त झाले. सुब्रत रॉय यांना तुरुंगात जावे लागले आणि खूप कष्टानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर तो अज्ञातवासात गेले. कधी-कधी त्यांच्या गर्भश्रीमंत दिग्गजांचा भोवती मेळावा असायचा, पण तुरुंगातून सुटल्यानंतर जवळचे लोकही त्यांना भेटायला टाळाटाळ करत. मात्र, मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि सहारा प्रमुख सुब्रत रॉयही त्याच सत्याच्या प्रवासाला निघाले गेले आहेत. त्यामुळे या अनंताच्या प्रवासात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार ते नक्की करतील.
इतर महत्वाच्या बातम्या