एक्स्प्लोर

एटीएममध्ये जाताना सावध, चोरट्यानं पैसे काढताना एकाला भोसकलं

औरंगाबाद: तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण एटीएमच्या मशीनमधून पैसे लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरामध्ये दलपतसिंह हे एटीएममधून पैसे काढत होते. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ तोंडावर कपडा बांधून एक तरुण एटीएममध्ये शिरला. दलपतसिंह पैसे काढण्यात मग्न असताना या तरुणानं चाकूच्या सहाय्यानं त्यांच्यावर हल्लाबोल केला.   अचानक झालेल्या हल्ल्यानं दलपत बिथरला. पण लगेच सावरत त्यानं प्रतिकार केला. दलपतनं आरडाओरडा केल्यानं चोरानं पळ काढला आणि दलपत बचावला.   जोधपूरमधली ही कहाणी सविस्तर सांगण्याचा उद्देश तुम्हाला सावध करणं हा आहे. कारण असे प्रकार याआधीही घडले आहेत. कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.   एटीएममधून पैसे काढताना ही काळजी घ्या!   - शक्यतो शुकशुकाट असलेल्या ठिकाणी आणि अवेळी पैसे काढू नयेत   - गजबजलेल्या आणि भरपूर उजेड असलेलं एटीएम निवडावं   - शक्यतो सुरक्षारक्षक असलेल्या एटीएममधूनच पैसे काढावेत   - ज्या ठिकाणी दरवाजा लॉक होतो असं एटीएम निवडावं   - पैसे काढताना रक्कम कुणाला दिसणार नाही अशी काढावी   - पैसे काढण्याआधीच कुणी आत येत असल्यास मज्जाव करावा   - एटीएममधून बाहेर पडताना पैसे मोजत बाहेर पडू नये   - मोठी रक्कम असल्यास कुणाला तरी एटीएमला सोबत न्यावं   खरं तर याआधीही बंगलोरमधल्या एटीएममध्ये झालेल्या या हल्ल्यानं एटीएमचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पण बँकांनी यातून धडा घेतलेला दिसत नाही. कारण सुरक्षेच्या नावाखाली एटीएममध्ये सीसीटीव्ही व्यतिरिक्त काहीच नाही   झटपट पैसा कमवण्यासाठी कुणीही कोणत्याही थराला जाऊ शकतं. पण त्यांच्या या अघोरी मार्गात एखाद्या निष्पापाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे बँकांनी एटीएम सक्षम आणि सुरक्षित करण्याची गरज आहे. तर लोकांनी एटीएममधून पैसे काढताना, जरा अधिक सावध राहण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सChhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!Anil Deshmukh : Akshay Shinde व  Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुयAkash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
भर रस्त्यात वीजेचा खांब, खांबावर खाट टाकला, ऐटीत बसून आंदोलन, मागणी नेमकी काय?
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या बिल्डरला अद्दल घडली, कुणाल बाकलीवाल विरोधात छ. संभाजीनगरध्ये गुन्हा दाखल
Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Nashik Crime : पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
पंचवटी हादरली! 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच
Baburao Chandere : बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
बिल्डरला उचलून रस्त्यावर आदळले, तरी बाबुराव चांदेरेंना अटक करणं बंधनकारक नाही! पुणे पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न?
Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Embed widget