एक्स्प्लोर
मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांना ईमेल
मोदींना धमकी देणारा ईमेल केवळ एका ओळीचा असून, त्यासंदर्भात तपास सुरु करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना अज्ञाताने पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात माहिती दिली. नोव्हेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु, असे ईमेलमध्ये म्हटल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
मोदींना धमकी देणारा ईमेल केवळ एका ओळीचा असून, त्यासंदर्भात तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, धमकीचा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, ईमेल नेमका कुणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर आली नाही.
गुप्तचर यंत्रणांनीही तपासाला सुरुवात केली असून, दिल्ली पोलिसांनी खास पथकं तयार करुन, पंतप्रधान मोदींना धमकी देणारा ईमेल पाठवणाऱ्याचा तपास सुरु केलाय. ईशान्य भारतातून धमकीचा ईमेल आल्याचा अंदाज असल्याने, पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement