एक्स्प्लोर

Ajit pawar, Nitish Kumar : महाराष्ट्रात अजितदादांची अन् बिहारमध्ये नितीशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली! तिकडं ममता बॅनर्जी पाठिंब्याबाबत बोलल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनावेळी मंगळवारी वाराणसीत दिग्गजांनी एकच गर्दी केली होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार गेले नाहीत.

Ajit pawar, Nitish Kumar : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या दोन टप्प्यांसाठी भाजपकडून देशपातळीवर प्रचारासाठी जोर लावला जात असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी फोडण्यापूर्वी महाविकास आघाडीचे भाग होते, तर नितीश कुमार महागठबंधन सरकारमध्ये होते. दोन्ही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला होता. आता निवडणूक मध्यावर आल्यानंतर हेच दोन नेते अचानक गायब झाल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. 

अजितदादांची अन् नितीशकुमारांची अचानक गायब होण्याची चर्चा रंगली!

विशेष म्हणजे बंगालमध्ये इंडिया आघाडीत सामील न होता स्वतंत्र निवडणूक लढवत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची सत्ता आल्यास बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनावेळी मंगळवारी वाराणसीत दिग्गजांनी एकच गर्दी केली होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार गेले नाहीत. विशेष म्हणजे दोघेही आजारी असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांच्या टायमिंगवरून चर्चा रंगली आहे. मोदी यांच्या मुंबईच्या रोड शोमध्येही अजित पवार सहभागी झाले नाहीत. दरम्यान, उद्याच्या (17 मे) सभेत अजित पवार सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. बारामती मतदान झाल्यानंतर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी मौन बाळगणे पसंत केले होते. 

नितीशकुमार गेले कोणीकडे?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वात जवळचे नेते सुशील कुमार मोदी यांच्या निधनानंतर, मंगळवारी त्यांनी पाटण्यात राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले, परंतु नितीश कुमार स्वतः पाटण्यात असूनही दिघा घाटावर गेले नाहीत.

नितीश कुमार दिवंगत पत्नी मंजू सिन्हा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 14 मे रोजी पाटण्याच्या कंकरबाग उद्यानातील पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत होते, त्यांच्या 17 व्या पुण्यतिथीला देखील ते गेले नाहीत. त्यामुळे प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते, त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याबाबत एक ओळीचा सरकारी आदेश जारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान मुख्यमंत्र्यांचे फोटो पाहून बिहारची सामान्य जनताही त्रस्त झाली आहे. नितीशकुमार आणखी अडचणीत आहेत का? मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे हेल्थ बुलेटिन जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांची टाळाटाळ

जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या कारमध्ये दिसले, तेव्हा लगेचच काहीतरी गडबड झाल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या 24 तासांनंतर, त्यांचे पाच दशके जुने सहकारी सुशील मोदी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि दुसऱ्याच दिवशी सरकारने मुख्यमंत्री आजारी असल्याची माहिती दिली, त्यामुळे त्यांचे सर्व सार्वजनिक उपक्रम पुढे ढकलण्यात आले. परंतु, नितीश कुमार यांच्या आजाराबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. परिस्थिती अशी आहे की ते आजारी कसे? असा प्रश्न थेट मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारीच टाळत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget