TomTom Traffic Index: ट्रॅफिकमुळे वेळेसोबत ड्रायव्हिंगचाही वाढत आहे खर्च, अहवालातून माहिती उघड
TomTom Traffic Index: डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम यांनी नुकताच ट्रॅफिक इंडेक्स जाहीर केला आहे. या अहवालात ट्रॅफिकमुळे ड्रायव्हिंगचा खर्च कसा वाढतो, याबाबत ही माहिती देण्यात आली आहे.
TomTom Traffic Index: डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम (TomTom) यांनी नुकताच ट्रॅफिक इंडेक्स जाहीर केला आहे. हा 2022 मध्ये 56 देशांमधील 389 शहरांमधील रहदारीच्या ट्रेंडचा तपशील देणारा अहवाल आहे. या अहवालात फक्त जगभरातील ट्रॅफिक समस्यांचा नाही तर त्यामुळे वाया जाणारा वेळ आणि ड्रायव्हिंगचा खर्च कसा वाढतो, याबाबत ही माहिती देण्यात आली आहे.
TomTom Traffic Index: वाहन चालविण्यासाठी हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर
वर्ष 2022 मध्ये अनेक कारणांमुळे ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत. यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. अहवालात सांगण्यात आलं आहे की, जगभरात ट्रॅफिकमुळे इंधनाचा वापरही वाढला आहे. परिणामी जगभरातील वाहनचालकांनी 2021 च्या तुलनेत त्यांच्या पेट्रोल टाकी भरण्यासाठी सरासरी 27% जास्त खर्च केला. डिझेल कार चालवणाऱ्यांनी 2022 मध्ये 2021 वर्षाच्या तुलनेत 48% अधिक खर्च केला. इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने हाँगकाँग हे वाहन चालविण्यासाठी सर्वात महागडे शहर बनले आहे. ज्यामध्ये चालकांनी गर्दीच्या वेळी दररोज प्रवास करण्यासाठी 1000 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला आहे.
TomTom Traffic Index: ड्रायव्हिंगचा वाढत खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल
इंधनाचा वाढत्या किंमतीमुळे अनेकांचा ड्रायव्हिंगचा खर्च वाढला आहे. यात प्रमुख युरोपियन शहरांमध्ये प्रवास खर्च कमी करण्यासाठी आणि त्यात सातत्य ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चालवण्यावर भर दिली जात आहे. यातच आता फास्ट चार्जिंग प्रणाली आल्याने अनेकजण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. आवाहलानुसार, लंडन सारख्या शहरात स्लो चार्जिंग पॉईंटवर चार्जिंग करणार्या ईव्ही ड्रायव्हर्सने पेट्रोलवर अवलंबून असलेले इंजिन वाहन चालवायला लागणाऱ्या खर्चाच्या जवळपास निम्मी बचत केली आहे. शिवाय ईव्ही चालवण्याची खूपच कमी खर्च येतो. फक्त एक वर्षाच्या आत सहजपणे इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढू शकतात, हे वर्ष 2022 मध्ये विशेष करून दिसून आलं आहे. मात्र विजेच्या किमती वारंवार बदलण्याची शक्यता कमी असते.
London Is the Slowest City to Drive: वाहन चालविण्यासाठी लंडन सर्वात स्लो शहर
लंडन हे वाहन चालविण्यासाठी सर्वात स्लो शहर असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. लंडनवासीयांना 6 किमी वाहन (11 mph) चालविण्यासाठी 35 मिनिटे लागतात. गर्दीच्या वेळी लंडनच्या शहराच्या मध्यभागी सरासरी वेग ताशी फक्त 9 किमी असतो.
या अहवालात एकूणच सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, जगभरातील मोठ्या शहरात जिथे वाहनांची संख्या जास्त आहे. तिथे ट्रॅफिकमुळे ड्रायव्हिंगचा खर्च वाढल्याचं 2022 या वर्षात दिसून आलं. याचं कारण म्हणजे वाढते इंधनाचे दर आणि ट्रॅफिकमुळे लागणार अधिकच वेळ. ट्रॅफिकमुळे पेट्रोल-डिझेलवर धावणारी गाडी अधिक वेळ एकाच ठिकाणी उभी असल्याने, तसेच तिला हळू-हळू पुढे जाण्यासाठी जितका वेळ लागतो, यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो. ज्यामुळे ड्रायव्हिंगचा खर्च वाढत आहे.