एक्स्प्लोर
कुछ तो लोग कहेंगे, स्मृती इराणींचा नाराजी लपवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज आपला नवा पदभार स्वीकारला. मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेतल्यामुळे आपण नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
काही जणांना वस्त्रोद्योग मंत्रालयाविषयी माहिती नसल्यामुळे ते चुकीचा अर्थ काढत आहेत. 'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना' असा फिल्मी डायलॉग मारत त्यांनी आपली नाराजी लपवली. इतकंच नाही तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनाही त्यांनी टोला मारला.
स्मृती इराणींना मनुष्यबळ विकास मंत्रीपदावरुन हटवलं, जावडेकरांची वर्णी
दुसरीकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयात वर्णी लागल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनीही माजी शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांची राहत्या घरी भेट घेतली. शैक्षणिक धोरण आणि मंत्रालयातील इतर धोरणात्मक कामांसाठी इराणींचा सल्ला घेण्यासाठी ही भेट होती असं स्पष्टीकरण जावडेकर यांनी दिलंय. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर केला. दोन वर्षात शैक्षणिक धोरणांवरुन वादात अडकलेल्या इराणींची वस्त्रोद्योग मंत्रालयात रवानगी करण्यात आली.मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, कोणाला कोणतं मंत्रालय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement