एक्स्प्लोर
टेस्लाच्या भारतातील प्रवेशाला ग्रहण, मोदी सरकारशी वाटाघाटी करणाऱ्या कार्यकारिणीचा राजीनामा
Tesla Car : इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या भारतात प्रवेशाबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Tesla Car : इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या भारतात प्रवेशाबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण टेस्ला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज खुराना यांनी राजीनामा दिला आहे. टेस्लाने भारतात प्रवेश करण्याची योजना स्थगित ठेवल्यानंतर काही आठवड्यांनंतरच हे राजीनामा प्रकरण समोर आलं आहे.
टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरवरुन स्पष्ट केलं होतं की, त्यांची कंपनी अशा कोणत्याही ठिकाणी उत्पादन प्रकल्प उभारणार नाही, जिथे त्यांना विक्री आणि सेवेची पूर्व मान्यता मिळत नाही. कंपनीने आता आपले लक्ष इंडोनेशियाकडे वळवले आहे, जो दक्षिणपूर्व आशियात उपलब्धता असलेला देश आहे. जिथे बॅटरीशी संबंधित गुंतवणूक केली जाईल. या व्यतिरिक्त, थायलंडमध्ये देखील लक्ष केंद्रित केले आहे. जिथे अलीकडेच त्यांनी आपल्या कार विकण्यासाठी स्थानिक युनिट म्हणून नोंदणी केली आहे.
कोण आहेत मनोज खुराना?
कोण आहेत मनोज खुराना?
खुराना यांना गेल्या वर्षी मार्च 2021 मध्ये भारतातील टेस्लाचे धोरण आणि व्यवसाय विकास कार्यकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. टेस्लाच्या भारतात प्रवेशाच्या नियोजनात त्यांचा मोठा हात होता. खुराना यांनी एक वर्षाहून अधिक काळ भारत सरकारकडे लॉबिंग केले, म्हणजे सतत त्यांच्या संपर्कांचा वापर करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला. खुराना यांनी इलेक्ट्रिक कारवरील आयात कर 100 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
..त्यामुळे टेस्ला यशस्वी नाही
..त्यामुळे टेस्ला यशस्वी नाही
टेस्ला आयात कर कमी केल्यानंतर, भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी चीनसारख्या उत्पादन केंद्रातून कार आयात करेल आणि येथील बाजारपेठेतील शक्यता तपासेल असा प्रयत्न करत होता. मात्र, मोदी सरकारने टेस्लाने आधी भारतात कार बनवावी आणि नंतर सवलतीची अपेक्षा करावी असा आग्रह धरला. यावरच एकमत न झाल्यामुळे टेस्लाने भारतात प्रवेश करण्याच्या आपल्या योजना पुढे ढकलल्या. यानंतर त्यांनी भारतात शोरूम स्थाने शोधणे बंद केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement