Kia Sonet कारला टक्कर देण्यासाठी येतेय Citroen C3! जूनमध्ये लॉंच होण्याची शक्यता
भारतात कॉम्पॅक्ट SUV कारची होणारी बंपर विक्री पाहून कार निर्माते मार्केटमध्ये त्यांची SUV कार लॉन्च करत आहेत.
Citroen C3 car launch : भारतात कॉम्पॅक्ट SUV कारची (SUV Car) होणारी बंपर विक्री पाहून कार निर्माते मार्केटमध्ये कार लॉन्च करत आहेत. अशातच Citroen ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रीमियम SUV Citroen C-5 Aircross लाँच केली होती. यानंतर, सप्टेंबर 2021 मध्ये, दुसरी कार Citroen C-3 मार्केटमध्ये लॉंच केली. या वर्षाच्या सुरुवातीस याची विक्री होण्याची अपेक्षा होती, परंतु आता जूनपर्यंत लॉन्च करण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.
सीएमपी मॉड्यूलर प्लॅटफॉर्म
Citroen C-3 कार एक कॉम्पॅक्ट क्रॉसओवर आहे. याची डिझाइन वेगळी असून ती सी-5 एअरक्रॉसशी जुळते. जर त्याच्या डायमेंशन बाबत बोलायचं झालं तर या कारची लांबी 3,980 मिमी असू शकते, यामध्ये तुम्हाला 180 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळू शकतो. हे सीएमपी मॉड्यूलर प्लॅटफॉर्मसह जोडलेले आहे. स्थानिक असल्याने, या कारची उत्पादन किंमत खूपच कमी असणे अपेक्षित आहे.
सिट्रोएन सी-3 चे फिचर्स
Citroen C3 च्या लुक, इंजिन आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हे Citroen कॉमन प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले आहे. तसेच फ्री-स्टँडिंग 10-इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देखील आढळू शकते. इतकेच नाही तर फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील (मल्टी-फंक्शन), डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी इतर अनेक प्रीमियम फिचर्सही या कारमध्ये मिळू शकतात. यात पॉवर-अॅडजस्टेबल OVRM, ऑल-एलईडी लाइटिंग, मशीन-कट अलॉय व्हील, सिल्व्हर-फिनिश स्किड प्लेट्स, फॉक्स रूफ रेल आणि ब्लॅक प्लॅस्टिक क्लेडिंग मिळणे अपेक्षित आहे. क्रॉसओवर 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असू शकते. त्यामुळे डिझेल इंजिनचा पर्याय नसण्याची शक्यता आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय येथे उपलब्ध असतील.
किंमत काय असेल?
जर याच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर Citroen C-3 ची किंमत 7 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यानंतर, मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : 'G7 देश युक्रेनला युद्धासाठी शस्त्रे आणि पैसा पुरवतील', युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा
- Russia Ukraine War : रशियाचे 4300 सैनिक ठार, 200 युद्ध बंदी; युक्रेनचा दावा