Kulgam Encounter : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचा कट फसला, दोन दहशतवादी ठार
Jammu Kashmir Encounter : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा कट उधळून लावला. कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन कुख्यात दहशतवादी ठार झाले आहेत.
PM Modi Visit Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहेत. त्याआधीच सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा कट हाणून पाडला आहे. कुलगाममधील मिरहमा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची नावं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल, सात एके मॅगझिन आणि नऊ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती देताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांदा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असून सुलतान पठाण आणि जबिउल्लाह अशी त्यांची ओळख पटली आहे. हे दहशतवादी 2018 पासून कुलगाम-शोपियान जिल्ह्यातील भागात सक्रिय होते.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पुढे सांगितले की, या दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून त्यात दोन एके-47, सात एके मॅगझिन आणि नऊ ग्रेनेडचा समावेश आहे.
Jammu and Kashmir: A Pakistani terrorist of the proscribed terror outfit JeM was eliminated in an encounter that broke out in the Mirhama area of the Kulgam district. Operation in progress.
— ANI (@ANI) April 23, 2022
(Visual deferred by unspecified time) pic.twitter.com/Bs6Ksiyggb
दरम्यान, जम्मूच्या बिश्नाह जिल्ह्यातील लालियान गावात एक संशयास्पद स्फोट झाला आहे. शेताच्या मध्यभागी हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
Jammu | "Suspected blast" reported by villagers in open agricultural land in Lalian village, Bishnah
— ANI (@ANI) April 24, 2022
Suspecting it to be a lightning strike or a meteorite; Investigation is underway, say police. pic.twitter.com/6PFaD8hHN0
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
- PM Modi Jammu Kashmir Visit : कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये, 20 हजार कोटींच्या योजनांचं लोकार्पण
- Mann Ki Baat : छोटी शहरं-गावांमध्ये UPI पेमेंटचा वापर वाढला, पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'द्वारे संबोधन
- PM Kisan Yojana : मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी येणार पैसे?