Mann Ki Baat : छोटी शहरं-गावांमध्ये UPI पेमेंटचा वापर वाढला, पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'द्वारे संबोधन
PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. हा या रेडियो कार्यक्रमाचा 88 वा भाग आहे.
PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 88 वा भाग आहे. 'मन की बात' हा पंतप्रधान मोदी यांचा रेडिओवरून प्रसारित होणारा मासिक कार्यक्रम आहे. याद्वारे पंतप्रधान प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता जनतेला संबोधित करतात. आज पंतप्रधानांनी 'मन की बात' द्वारे विविध विषयांवर जनतेला संबोधित केला. 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, देशाला नवीन संग्रहालय मिळालं आहे. पीएम म्युझियममधून जनतेला पंतप्रधानांशी संबंधित रंजक माहिती मिळत आहे. त्यामुळे इतिहासाबद्दल लोकांची आवड वाढली आहे.
पंतप्रधान यावेळी म्हणाले की, 'तंत्रज्ञानाची ताकद सामान्य लोकांचे जीवन कसे बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल झालेलं पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत भीम यूपीआय (BHIM UPI) झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतांश गावांमध्येही लोक UPI द्वारेच व्यवहार करण्यात येत आहेत.'
स्वातंत्र्यप्राप्तीच्या या 75 व्या वर्षात स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जे संकल्प पूर्ण करण्याची ध्येय बाळगून देश आगेकूच करतो आहे, त्यात जलसंधारणाचा संकल्प महत्वाचा आहे
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) April 24, 2022
देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बांधली जाणार आहेत-
-पंतप्रधान#MannKiBaat pic.twitter.com/l52FMqmKll
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता यावरून कोणत्याही देशाची प्रगती आणि गती ठरते. त्यामुळे स्वच्छतेसारख्या विषयांसोबतच जलसंधारणाचा मुद्दा 'मन की बात'मध्ये वारंवार उपस्थित करणे गरजेच आहे. देशातील बहुतांश भागात उष्णता झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढली आहे. तुम्ही आता जिथे आहात तिथे भरपूर पाणी उपलब्ध असू शकते. पण, पाण्याचा ताण असलेल्या भागात राहणार्या करोडो लोकांचाही तुम्हाला विचार करावा लागेल, ज्यांच्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतसारखा आहे. यामुळेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'त जलसंधारण हा एक महत्त्वाचा संकल्प आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi Jammu Kashmir Visit : कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये, 20 हजार कोटींच्या योजनांचं लोकार्पण
- PM Kisan Yojana : मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी येणार पैसे?
- Coronavirus Cases India : देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!